अखेर किन्ही ग्रामसेविकेची चुंचाळे येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:23+5:302020-12-16T04:32:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बदली रद्द करण्यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचा आरोप असलेल्या किन्ही, ता. भुसावळ येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बदली रद्द करण्यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचा आरोप असलेल्या किन्ही, ता. भुसावळ येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांच्या बदलीचे आदेश जिल्हा परिषद सीईओंनी अखेर काढले असून, त्यांची यावल तालुक्यातील चुंचाळे येथे बदली करण्यात आली आहे.
ग्रामसेविका बाविस्कर यांनी दयासंबंधीचे आणि पक्षाघाताचा त्रास असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले असता त्यांची बदली रद्द करण्यात आली होती. मात्र, ज्या कालावधित हा त्रास असल्याचे प्रमाणपत्रात नमूद केले होते, त्या कालावधीत त्या कर्तव्यावर होत्या. त्यामुळे त्यांचे हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी केली होती, तसेच त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाविस्कर यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी झाली असता त्यांना आरोग्यविषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा निल रिपोर्ट देण्यात आला होता. अखेर त्यांची बदली करण्याचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत.
संपूर्ण बदली प्रक्रियेच्या चौकशीची मागणी
जिल्हा परिषदेत मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर बदली प्रक्रिया राबविली गेली. मात्र, विविध पातळ्यांवर याबाबत तक्रारी समोर आल्या होत्या. त्यातील ज्या तक्रारीची तपासणी झाली त्यात तथ्थ्य आढळून आल्यानंतर बदली थांबविण्यासाठी किंवा हव्या त्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी एक रॅकेट सक्रिय तर नाही ना असा तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे. संपूर्ण बदली प्रक्रियेच्या चौकशी मागणी समोर आली आहे.