एव्हरेस्टचा बेस कॅम्प केला १४ दिवसात सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:16 PM2018-11-26T23:16:57+5:302018-11-26T23:21:06+5:30
न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्प ट्रॅक १४ दिवसांत पुर्ण केला.
जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्प ट्रॅक १४ दिवसांत पुर्ण केला. या ट्रॅकची समुद्रसपाटी पासून ५३८० मिटर उंची आहे.
काठमांडू (नेपाळ) पासून विमानाने लुकला या जगातील सर्वात उंच विमानतळावर उतरून लुकला पासून त्यांनी आपल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प या ट्रेक च्या चढाईला सुरवात केली. ९ दिवस चढाईला व उतरण्यासाठी ५ दिवसाचा कालावधी लागला. ऊणे १० तापमान, आॅक्सिजनचे कमी प्रमाण अशा प्रतिकूल परिस्थितीत हा कॅम्प केल्याचे शर्मा व महाजन यांनी सांगितले. ते स्टेटस क्लब व कलाविष्कार मंडळ या संस्थेचे संचालक आहे.
यापूर्वी त्यांनी कळसुबाई, अलंग मलंग कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड असे खडतर ट्रॅक पुर्ण केले आहे. येत्या दोन तीन वर्षात जगातील उंच शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.