जीवनाच्या प्रत्येक शाळेत जावेच लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:44 PM2017-10-10T15:44:59+5:302017-10-10T15:46:19+5:30

औरंगाबाद खंडपीठातील वकील आणि मूळचे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रहिवासी श्री. माधव भोकरीकर वकिलीच्या क्षेत्रात आलेले विविध अनुभव दर आठवडय़ाला ‘लोकमत’साठी ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘कायद्यातील गमती-जमती’ या सदरात लिहिणार आहेत.

Every school of life has to go | जीवनाच्या प्रत्येक शाळेत जावेच लागते

जीवनाच्या प्रत्येक शाळेत जावेच लागते

googlenewsNext

जसा जन्म होतो, तसा त्याला शाळेत प्रवेश घ्यावाच लागतो. जीवनाच्या शाळेत शिकावेच लागते प्रत्येकाला अनुभव घेत घेत! तुमची इच्छा असो व नसो! या शाळेत मग काही अनुभवाने शहाणे होतात, तर काही आयुष्यभर शिकल्यावरदेखील शहाणे होतातच असे नाही. प्रत्येकाच्या क्षेत्रातील अनुभव हे त्याचे स्वत:चे आणि त्याच्या व्यवसायातूनच मिळतील, असे वैशिष्टय़पूर्ण अनुभव असतात! माझा व्यवसाय हा ‘वकिलीचा.’ यातील अनुभवाचे भाग म्हणजे पहिले म्हणजे ज्यांना कोणीतरी फसविले ती मंडळी, दुसरे म्हणजे जे अगदी व्यवस्थित व योजनाबद्ध पद्धतीने दुस:याला फसवतात ती मंडळी आणि तिसरे म्हणजे कोणताही संबंध नसताना जे संकटात सापडतात ती मंडळी ! पण, एक मात्र गंमत असते. यातील प्रत्येकाला या संकटातून सुटका, अगदी कायदेशीर सुटका हवीच असते. मग न्यायालयाशिवाय दुसरा मार्ग नाही. जो सर्वसंमत आहे. बस, यानिमित्ताने असेच काही आलेले अनुभव आणि घडलेल्या घटना आपल्याला गप्पा मारत, सांगाव्यात असे मनात आले. बघू या, आपल्याला आवडतात का आणि आपणास यातून काही शिकता येते का? साधारणत: फेब्रुवारी 1998 मधील घटना असावी. सातपुडय़ाच्या पायथ्याच्या गावातील महाराष्ट्रातील एक कुटुंब! हिंदू कायदा लागू असलेले! सर्वसाधारण गरीबच म्हणता येईल. पण शेतीबाडी बाळगून असलेले! दिवसेंदिवस कुटुंब वाढणारे आणि मिळणारे उत्पन्न त्या मानाने नाही, हे ठरलेले! शेवटी कुटुंबाची एक शाखा 1930-32 च्या सुमारास मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर या गावी पोटापाण्यासाठी गेली. कुटुंबात खाणारी माणसे कमी झाली. गाव वा घर सोडताना सोनेनाणे, पैसाअडका, भांडीकुंडी नेता येतात. काही वेळा पोटापुरते का होईना पण काही दिवसाचे धान्य नेता येते. पण कुटुंबाची स्थावर मिळकत म्हणजे घरदार, शेतीबाडी कशी नेणार? ती तेथेच रहाते तेथे राहणा:या मंडळींसाठी! हे सर्व माहीत असणारी पिढी जोर्पयत जिवंत असते, तोपावेतो त्यातील सदस्यांना वाटते, ‘घर सोडून गेलेल्यांचा पण यात हिस्सा आहे, हक्क आहे. अधूनमधून ते तसे बोलतातपण आणि त्यांच्या वागण्यातूनही ते जाणवते. तोपावेतो ठीक असते असे समजावे लागते. काळपरत्वे माणसे जग सोडून जातात आणि कारभार पुढच्या पिढीच्या हातात येतो. घर सोडून गेलेल्याबद्दल काही कृतज्ञता असेल किंवा मागील पिढीने काही सांगितले असेल आणि ही पुढील पिढी त्याचे मान ठेवणारी असेल, तरीपण ठीक असते. मात्र कालांतराने ही पिढीपण निघून जाते. नातेसंबंध विरळ होत जातात आणि स्वार्थाची वीण घट्ट होत जाते. जे काही आहे ते सर्व आपलेच आहे, यात कोणाचाही कसलाही संबंध नाही, असे ते सुरुवातीला दबक्या आवाजात आणि नंतर खुल्या, मोठय़ा आवाजात सांगू लागतात! कालांतराने ते आपल्याच मनाला समजावतात की ‘हे आता सर्व आपलेच आहे, कोणाचाही कसलाही संबंध नाही.’ गंमत म्हणजे त्यांचाही हळूहळू हाच समज होत जातो. याला ‘वरवर कायदेशीर’ स्वरूप देण्याचे काम करतो ते, ब्रrादेवसुद्धा जे कोणाच्या ललाटी लिहू शकत नाही. ते लिहिणारा ‘सरकारी नोकर तलाठी’ आपल्या सर्वाच्या परिचयाचा! गाव सोडून गेलेल्या मंडळींची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे सात-बाराच्या उता:यावरून गुप्त करणे हे त्याच्या दृष्टीने काही विशेष नसते. एक दिवस गाव सोडून गेलेल्या पिढीतील सर्वाची नावे सात-बाराच्या उता:यावरून पूर्णपणे अदृश्य होतात आणि ही मिळकत सरकार दप्तरी फक्त यांचीच दिसायला लागते. 1930-32 मध्ये ओंकारेश्वरला गेल्या पिढीचे, त्यांच्या वारसांची नावे 1997-98 पावेतो पूर्णपणे गुप्त, नाहीशी झालेली होती. त्या शेतीशी असलेला त्या कुटुंबाच्या शाखेचा सात-बाराच्या उता:यातून दिसणारा संबंध संपला, संपवला गेला, तसे दाखवले गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी उता:यावरील असलेल्या किती मिळकती एकटय़ाने, एकटय़ाच्याच समजून विकल्या, त्याची कल्पना त्या ओंकारेश्वरच्या शाखेला दिली किंवा नाही हे त्या ‘ओंकारेश्वरच्या मामलेश्वरालाच’ माहीत ! हा विषय आजचा नाही. शेवटची शेती राहिली होती विकायची, व्यवहार ठरला. त्या अगोदर सात-बा:याचे शेतीचे उतारे घेणा:याने बघितले. ब:याच वर्षाचे जुने उतारे वरवर पाहिले तरी त्यांत शंका येण्यासारखे काही दिसत नव्हते. कारण गेल्या कित्येक वर्षात त्या गावात हे एकटेच कुटुंब राहत होते. हे एवढेच कुटुंब आहे, असा समज होण्यासाठी पुरेसे होते. अशी कोणास ठाऊक, पण ही बातमी ओंकारेश्वराला त्या कुटुंबातील सर्वात वृद्ध माणसाला समजली. ‘येथे आपली वडिलोपार्जित शेती आहे. ती आपण विकलेली नाही,’ हे त्याला माहीत होते. त्याने हे मुलाला सांगितले. मुलगा पत्रकार होता, तो त्याच्या शेतीच्या तालुक्याच्या गावाला आला. त्याने सर्व कागदपत्रे गोळा केली.

Web Title: Every school of life has to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.