प्रत्येकाने प्रत्येक दिवस मातृदिन समजावा
By Admin | Published: May 14, 2017 06:34 PM2017-05-14T18:34:38+5:302017-05-14T18:34:38+5:30
ज्याने आईची सेवा केली तो नक्कीच या जगातील सर्वात भाग्यवान असे मी मानतो,
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 14 - ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे तत्व प्रत्येक पावलागणीक लागू पडते. ज्याला आईची सेवा करण्याची संधी मिळाली, ज्याने आईची सेवा केली तो नक्कीच या जगातील सर्वात भाग्यवान असे मी मानतो, अशा भावना राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी व्यक्त केल्या़.
आई ही सर्वात श्रेष्ठ असल्याने आईची सेवा करण्याला सर्वानी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आह़े आईची माया ही कुठेही विकत मिळत नसल्याचे सांगत ती मिळणे हेदेखील नशीब असल्याचे ते म्हणाल़े आईचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी सर्वानी घेणे आवश्यक आहे.आई ही सर्वासाठी दैवत असल्याने प्रत्येक दिवस हा मातृदिन असायला हवा. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील आईच्या अनेक आठवणी सांगत आपल्या भावना मोकळ्या केल्या.