जळगाव जिल्ह्यात सर्वत्र महिला दिनाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:32 PM2019-03-09T17:32:53+5:302019-03-09T17:33:30+5:30
ठिकठिकाणी विवध उपक्रम
जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले. शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आल्या. तसेच महिला संघटनांतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
शेंदुर्णी
येथील श्री सुवर्णकार प्रतिष्ठानतर्फे सुवर्णकार माहिलांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुवर्णकार प्रतिष्ठानच्या जेष्ठ सदस्या लता आहिरराव होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रमुख मार्गदर्शक प्रॉ.डॉ. योगिता चौधरी उपस्थित होत्या. स्त्रीभृण हत्या, महिला सबलीकरण व सशक्तीकरण या विषयी प्रा. योगिता चौधरी यांनी मार्गदर्शन केले. उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत यशस्वी झालेल्या मनिषा चौधरी हिचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय विसपुते यांनी केले. सूत्रसंचलान सपना विसपुते यांनी केले. माधुरी विसपुते यांनी परिचय करून दिला. सोनाली विसपुते यांनी आभार मानले. या वेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुसावळ
रेल्वेच्या कृष्ण चंद्र सभागृहात दुपारी महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मध्यरेल्वेच्या भुसावळ रेल्वे विभागामध्ये उकृष्ठ कामगिरी केल्याबदल भुसावळ विभागाच्या ६२ महिला कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व शील्ड प्रदान करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रमुख अतिथि म्हणून भोपाळच्या डॉ. पूनम सिंह बरकुल्ला, रेल्वे महिला कल्याण समितीच्या रजनी सिन्हा, प्रीती मिश्रा, भाग्यश्री कदम, रजनी शर्मा, लता अय्यर, वांसती ओक, सारिका गर्ग, डॉ. प्रतिभा कुमारी, डॉ. रश्मी चौधरी उपस्थित होत्या. वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. डी. गागुर्डे, वरिष्ट विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा, विभागीय अभियंता एम. बी. तोमर, विभागीय कार्मिक अधिकारी एम.के. गायकवाड, सहायक कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी, स्टेशन संचालक जी. आर. अय्यर, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, कार्मिक अधिकारी आणि कल्याण निरीक्षक उपस्थित होते.
वाघडू, ता.चाळीसगाव
जि.प. शाळेत झालेल्या कार्यक्रमाला सरपंच अनिल पाटील, उपसरपंच मधुकर पाटील, ग्रा. प. सदस्य प्रवीण पाटील, गुलाब पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापिका चंद्रकला साळुंखे यांनी केल. ईश्वर तवर, भास्कर महाजन, सिद्धार्थ बागूल उपस्थित होते.
कजगाव, ता.भडगाव
येथून जवळच असलेल्या भोरटेक बु. येथे ग्रा.पं.च्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा व सैन्यदलातील जवानांच्या मातांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैन्यदलात असलेल्या जवान मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अनिता देशमुख, विठाबाई बच्छे, सीमा पाटील या सैन्यदलातील जवानांच्या मातांचाही सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात आपले कुटुंब सांभाळून कार्य करणाºया विविध महिलांना सन्मानित करण्यात आल. पंचायत समिती सदस्या अर्चना पाटील, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, भोरटेकचे सरपंच उमेश देशमुख, उपसरपंच मंगल महाजन, शिंधूबाई पाटील, कविता देशमुख, मंगलबाई महाजन, रामबाई महाजन, छबाबाई भिल, मीराबाई भिल, ग्रामसेवक एस.बी. मोरे, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र धनगर, मंगा भिल यांच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता साळुंखे यांनी केले तर ललितप्रभा बाविस्कर यांनी आभार मानले.
भडगाव
जि.प. प्राथमिक शाळा क्र. २ भडगाव पेठ येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका प्रतिभा पाटील होत्या. प्रास्ताविक योगेश चिंचोले यांनी केले. यावेळेस महिलांच्या संगीतखुर्ची, लिंबू चमचा इ. स्पर्धा घेण्यात आल्या. उपस्थित महिलांचे स्वागत मुख्यध्यापक मालचे, योगिनी पाटील, उषा सूर्यवंशी, यांनी केले. दीपमाला जगताप यांनी आभार मानले.
चाळीसगाव
रयत सेना व अंकुर साहित्य संघाच्यावतीने पवारवाडी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.अस्मिता पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, अंकुर साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ. साधना निकम, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी सचिव डॉ. विनोद कोतकर , उंमग महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, आई फाउंडेशनच्या डॉ. चेतना कोतकर, नगरसेविका विजया पवार, योगिनी ब्राम्हणकार, सविता राजपूत, पत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, रयत सेनेच्या महिला शहराध्यक्षा निर्मला महाजन आदी उपस्थित होते. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तेजल नानकर या विद्यार्थिनीच्या चित्र प्रदर्शनीचे उद््घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ. साधना निकम यांनी केले. रयत सेनेच्या स्थापना दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अर्चना भजनी मंडळ, इनर्व्हील क्लब आॅफ संगम, उन्नती भजनी मंडळ, उमंग समाजशिल्पी महिला परिवार, सिद्धी महिला मंडळ, आई फाउंडेशन, गौराई भजनी मंडळ, भक्तीगंध भजनी मंडळ आदी मंडळासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया महिला व मुलींचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाहू मराठा मंडळाचे अॅड प्रदीप एरंडे, सचिन स्वार, भिकन गायकवाड, जी.जी. वाघ, अॅड.नानकर, धर्मराज खैरनार, विनायक मांडोळे, प्रा. सुनील जाधव, धनंजय गायकवाड, प्रदेश समन्वयक पी. एन. पाटील, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी जिल्हाध्यक्ष दीपक राजपूत, शिक्षक सेना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, मुकुंद पवार, शहराध्यक्ष योगेश पाटील, गणेश देशमुख, अभिमन्यू महाजन, विकास बागड, अंकुर साहित्य संघाचे प्रा. पी.एस. चव्हाण, रमेश पोतदार, प्रा.श्यामकांत निकम, मंगला कुमावत, नलीनी पाटील, रयत सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गौरव पाटील, अनिकेत शिंदे, मंगेश देठे, शुभम शिंदे, दीपक सागळे, तेजस गवळी, मोहन भोई आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती देशमुख यांनी केले. रयत शिक्षक महिला सेना तालुकाध्यक्षा जयश्री माळी यांनी आभार मानले.
मुक्ताईनगर
येथील पंचायत समिती सभागृहात विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती शुभांगी भोलाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी डी. आर. लोखंडे, न्या.एस. एस. सरदार, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, अॅड. राहुल पाटील, अॅड. एस.एम.तायडे, अॅड. इंगळे, अंतुर्ली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशा वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज लुल्हे यांनी केले. अंगणवाडी क्र. १ व २ येथे अंगणवाडीच्या विविध योजनांची तसेच मतदान जनजागृती व मतदार यादीत नवीन नाव समाविष्ठ करण्यासंदर्भात नगरपालिकेचे कर्मचारीे सचिन काठोके, अंगणवाडी सेविका अनिता चौधरी, साधना महाजन, भारती वंजारी, सुरेख महाजन यांनी माहिती दिली.