आर्थिक गणना अचूक व मुदतीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:24+5:302020-12-17T04:42:24+5:30
जळगाव - आर्थिक गणना अचूक व मुदतीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य कराआर्थिक गणना अचूक व मुदतीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, ...
जळगाव - आर्थिक गणना अचूक व मुदतीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य कराआर्थिक गणना अचूक व मुदतीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
केंद्र शासनाव्दारे सातव्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. आर्थिक गणनेमध्ये देशामध्ये सर्व आर्थिक घटकांची मोजणी करण्यात येत आहे. आर्थिक गणनेची माहिती संकलित करणे, अहवाल जाहीर करणे, केंद्रस्तरावर निर्णय घेणे आदी बाबी सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामर्फत करण्यात येणार आहे. तसेचआर्थिक गणनेंतर्गत माहिती संकलनाचे काम प्रत्येक घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष भेट देवून याची माहिती पेपरलेस पध्दतीने मोबाईल आज्ञावलीव्दारे संकलित करण्यात येईल. ही गणना देशामधील असंघटीत क्षेत्रातील आर्थिक घटकांच्या एकत्रित माहितीचा मुख्य स्त्रोत असणार आहे. आर्थिक गणनेची माहिती संकलन ग्रामपंचायत तसेच शहरातील प्रभाग स्तरावर होणार असून या माहितीचा उपयोग उद्योग प्रामुख्याने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाकरीता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरीता होणार आहे. यापूर्वी वर्ष २०१३ मध्ये सहावी आर्थिक गणना पूर्ण करण्यात आली होती. देशांतर्गत चालू असलेल्या आर्थिक घडामोडी त्यांचे भोगोलिक क्षेत्र, कामगारांची संख्या व वितरण मालकीचे प्रकार, आर्थिक स्त्रोत आदी माहितीचा समावेश आर्थिक गणनेमध्ये करण्यात येणार आहे.
३१ डिसेबरपर्यंत कामे पूर्ण करा
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ७ व्या आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामाचा आढावा घेण्याकरीता १५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती. त्यात आर्थिक गणनेचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुनिश्चित करावे. असे आदेश जिल्हा व्यवस्थापक कॉमन सर्व्हिस सेंटर यांना दिले आहे.