जळगाव तालुक्यातील मतदान केंद्रांवर ईव्हीम मशिन्स रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:48+5:302021-01-15T04:14:48+5:30
जळगाव - जळगाव तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी शुक्रवार, १५ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी गुरुवारी दुपारी ...
जळगाव - जळगाव तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी शुक्रवार, १५ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयाच्यावतीने मतदान केंद्रांवर इव्हीएम मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे ४० ग्रा.पं.साठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ४० ग्रा.पं.मधील ४६३ जागांसाठी तालुक्यातील १ हजार २४ उमेवार रिंगणात आहे. दरम्यान, शुक्रवारी मतदान होणार असल्यामुळे ईव्हीएम मशिन व इतर आवश्यक साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजेपासून मतदान अधिकारी यांना नूतन मराठा महाविद्यालयात बोलविण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयाच्या एका हॉलमध्ये यंत्रांची तपासणी करून खाजगी वाहनातून केंद्रांना रवाना करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यात १७० मतदान केंद्र
जळगाव तालुक्यात १७० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात ४ पोलिंग ऑफिसर व १ शिपाई अशी रचना करण्यात आलेली आहे. तातडीच्या परिस्थितीत राखीव कर्मचाऱ्यांची पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत.