हायरिस्क रुग्णाची ४८ तासांच्या आत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:56+5:302021-04-28T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी मंगळवारी मोहाडी महिला रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी मंगळवारी मोहाडी महिला रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, आणि चोपडा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी त्यावेळी रुग्णांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा देखील घेतला. त्यात ऑक्सिजन मॅनेजमेंट करण्याच्या सुचना देखील दिल्या.
राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा मंगळवारी दुपारी घेतला. त्यात जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करणे, ऑक्सिजन गरजेपेक्षा जास्त न वापरणे, रुग्णांच्या हायरिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट यांची ४८ तासांच्या आत तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबतच प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण शोधले पाहिजे. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का? याचीही तपासणी करण्याच्या सुचना देखील त्यांनी दिल्या. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील या जळगावचा आढावा घेऊन नंतर धुळे येथे रवाना झाल्या आहेत.