अपघातग्रस्त इंजीनची तपासणी

By admin | Published: April 28, 2017 11:59 PM2017-04-28T23:59:10+5:302017-04-28T23:59:10+5:30

रेल्वे सेफ्टी कमिशनर चंद्रा यांची पीओएच शेडला भेट : धनबाद येथे झाला होता अपघात

Examination of the injured engine | अपघातग्रस्त इंजीनची तपासणी

अपघातग्रस्त इंजीनची तपासणी

Next

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील पीओएच शेडमध्ये (विद्युत इंजीन कारखाना) दुरुस्तीसाठी आलेल्या कल्याण शेडमधील अपघातग्रस्त डब्ल्यूएजी-9- 31413 या क्रमांकाच्या रेल्वे इंजीनची कमिशनर ऑफ  रेल्वे सेफ्टी (सीआरएस) सुशील चंद्रा यांनी पाहणी   केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 31413 या  रेल्वे इंजीनला गेल्या वर्षी धनबाद रेल्वे विभागात मोठा अपघात झाला होता. त्यात इंजीनचे मोठे नुकसान झाले होते. हे इंजीन मुंबई विभागातील कल्याण शेडचे आहे. अपघातानंतर ते डिसेंबर 2016 मध्ये भुसावळ येथील रेल्वे विद्युत कारखान्यात दुरुस्तीसाठी दाखल झाले.तेव्हापासून त्याची दुरुस्ती सुरू होती. त्याची आज चंद्रा यांनी बारकाईने पाहणी केली. प्रसंगी भुसावळ विभागाचे डब्ल्यूएजी-5-23568 या इंजीनसह बोगी, ट्रान्सफॉर्मर आदी विभागांची पाहणी केली. त्यांनी विद्युत इंजीन कारखान्यातील इंजीन दुरुस्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. त्यांच्यासोबत  डीआरएम आर.के. यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, विद्युत इंजीन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जी. सी. पौनिकर, सिनिअर ईडीपीएम भातो, वरिष्ठ विद्युत अभियंता सारिका गर्ग, सहायक कारखाना व्यवस्थापक आर. एम. श्रीवास्तव, रामफल यादव आदी अधिकारी उपस्थित होते. डब्ल्यूएजी-5-23568 या इंजीनजवळ व्ही. एम.टोपरे, श्याम रणदाळे  आदी हजर होते. डब्ल्यूएजी-9-31413 जवळ डी. जी.सोनवणे, बी.वाय.चौधरी, इ.सी.पात्रो, विवेक ठाकूर, शुभम भदाणे आदी उपस्थित होते.
यांनी दिली माहिती
  कारखान्यातील वरिष्ठ अनुभाग अभियंता डी.जी. सोनवणे यांनी सेफ्टी रेल्वे कमिशनर सुशील चंद्रा यांना धनबाद येथील अपघातात बिघाड झालेल्या इंजीनमधील तांत्रिक बाबींची माहिती दिली. इंजीनमध्ये काय बिघाड होता हे त्यांनी विस्ताराने सांगितले.

Web Title: Examination of the injured engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.