दापोरात बाहेरून आलेल्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:43 PM2020-03-25T20:43:27+5:302020-03-25T20:43:41+5:30
दापोरा, ता. जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक अतिशय भीतीने राहत आहे. दापोरा येथे कामानिमित्त ...
दापोरा, ता. जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक अतिशय भीतीने राहत आहे. दापोरा येथे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक गावात येत असून त्यांची सर्वप्रथम ग्रामपंचायतीस माहिती देउन प्राथमिक आरोग्य तपासणी जिल्हा सामान्य रूग्णालयात करून घेतली जातआहे.
कोरोना विषाणूसारख्या महामारीचा सर्व जग सामना करीत असताना संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू असूनदेखील तालुका पोलिस स्टेशनचे एकही कर्मचारी वा पथकाने दापोरा येथे फिरकला नसल्याची परिस्थिती आहे.
दापोरा येथील कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांवर आम्ही लक्ष ठेवून असतो व गावात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या कुटूंबाला बोलवून आरोग्य तपासणीला पाठविण्यासाठी सांगतो.
-विजय सोनवणे, ग्रामस्थ
कामानिमित्त मी बाहेरगावी होतो मी गावात येण्यापूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात जावून माझी वैद्यकीय तपासणी करून घेतली.
-विनायक गंवदे, बाहेरगावी गेलेले ग्रामस्थ
दापोरा गावात येणाऱ्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाते तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नावनोदणी करनेबाबत सूचित केले आहे.
-दिलीप पवार, ग्रामसेवक