विद्यापीठाच्या उद्यापासूनच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:50 PM2020-03-17T12:50:35+5:302020-03-17T12:51:05+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १७ ते ३१ मार्चपर्यंतच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ...

Exams from the university tomorrow postponed | विद्यापीठाच्या उद्यापासूनच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विद्यापीठाच्या उद्यापासूनच्या परीक्षा पुढे ढकलल्या

googlenewsNext

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १७ ते ३१ मार्चपर्यंतच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, १ एप्रिल नंतरच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी़ए़, बीक़ॉम़, बी़एस्सी़, तसेच बीएसडब्ल्यू व बीएस आणि मास कम्युनिकेशन आदी परीक्षा १७ मार्चपासून प्रांरभ होणार होत्या़ मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात सोमवारी शासनाने निर्णय घेतला़ त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३१ मार्चपर्यंत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत़
तसेच मंगळवारपासून होणारी प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्यात आलेली आहे़ मात्र, १ एप्रिल नंतरच्या परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार होणार आहेत़
ग्रामीण भागातील शाळाही राहणार बंद
शहरी भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी सरकारने घेतला होता. आता ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक सरकारी शाळा, जि़प़ शाळा तसेच खाजगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयचे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना आदेश दिले आहे़

Web Title: Exams from the university tomorrow postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव