मुक्ताईनगर तालुक्यात वीस गावांसाठी विहिर अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 05:40 PM2017-04-21T17:40:52+5:302017-04-21T17:40:52+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी विविध स्वरुपाचे 24 प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.
Next
मुक्ताईनगर,दि.21- तालुक्याची संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठक सर्वपक्षीय झाल्यानंतर प्रशासन अतिशय गतीमान झाले आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे बैठक घेत तालुक्यातील 20 गावांसाठी विहिर अधिग्रहीत केल्या तर विहिर खोलीकरण करणे, आडवे बोअर करणे नवीन विंधन विहिरी तयार करणे, हातपंप बसवणे व ताप्तुरत्या पाणीपुरवठा योजनेसाठी असे एकूण 24 प्रस्ताव मंजुरीसाठी विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. सध्या तरी तालुका टँकरमुक्त असल्याचे दिसून येत आहे.
सुरूवातीला बारा प्रस्ताव मंजुर करण्यात आले होते व 20 रोजी उर्वरीत आठ असे एकूण 20 प्रस्ताव तत्काळ मंजूर केले आहेत. विहिर अधिग्रहण पिंप्राळा, राजुरा, धामणगाव, चिंचखेडा बु.।।, तालखेडा, धामणगाव तांडा, बोरखेडा (जुने), वायला, धुळे, खामखेडा, कुंड, बोराखेडा (नवे), रामगड वस्ती, वढोदा, सुकळी, दुई, रिगाव, सुळे व लालगोटा या गावांसाठी करण्यात आले आहेत.
(वार्ताहर)