पूर्णा नदीपात्रात उत्खननात सापडले वाळूचे थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:06+5:302021-07-07T04:20:06+5:30
या ठिकाणी आजपर्यंत फक्त गाळ पाहिला अचानक वाळू कशी यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर आता काठाला जमिनीखाली ...
या ठिकाणी आजपर्यंत फक्त गाळ पाहिला अचानक वाळू कशी यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर आता काठाला जमिनीखाली वाळूचे थर शोधण्याचा नवा उपद्व्याप वाळूमाफियांनी सुरू केला आहे.
यंदा तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव झाले नाहीत. जवळपास सर्वच मोठे वाळू घाट हे तापी पात्रात आहेत. काही तांत्रिक तर काही प्रशासनिक कारणांनी वाळू घाटाचे लिलाव बारगळले किंबहुना बाहूना होऊ शकले नाही परिणामी तापी पात्रातील वाळू चोरट्या व तस्करीच्या स्वरूपात वाळू विक्री होत असते.
दरम्यान, पूर्णा नदी पात्रात कधीच वाळू नसते, नदीत दर वर्षी मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो व पुढे धरण असल्याने अधिकतर गाळ येथे स्थिरावतो. परिणामी दरवर्षी गाळ साचल्याने नदी पात्र व काठावर गाळ जमा होतो. हा गाळ शेती उपयोगी असल्याने
दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी हजारो ट्रॅक्टर गाळ शेतकरी येथून वाहून नेतात.
खामखेडा पुलालगतच्या पंप हाऊसकडील भागात गाळ काढण्याचे व वाहतुकीचा प्रकार सुरू असताना या ठिकाणी अचानक जमिनीपासून चार फूट खाली वाळूचा थर लागला सुमारे दीड ते दोन फुटांचा हा थर आहे. वाळू निघत असल्याचे पाहून या भागात यांत्रिकी साह्याने खड्डे करणे सुरू झाले आणि वाळू काढण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
रविवारी रात्री या ठिकाणावरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची धडपड सुरू झाली आणि पूर्णेत वाळू मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ट्रॅक्टर, डंपर या भागात पोहोचू लागले. दिवस उजाडला वाहनांची गर्दी पांगली; मात्र परत या ठिकाणी वाळूसाठी रात्रीस खेळ करण्याचे अनेकांचे नियोजन सुरू होते.
फोटो ०६सीडीजे ०९
जमिनीखालून वाळू काढण्यास पूर्णा नदी पात्रालगत करण्यात आलेले मोठं मोठे खड्डे.