पारोळा येथील बालाजी शैक्षणिक संकुलात गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:07 PM2018-08-20T16:07:34+5:302018-08-20T16:07:54+5:30

कठोर परिश्रम करण्याचे मान्यवरांचे आवाहन

Excellence in Balaji Educational Complex at Parola | पारोळा येथील बालाजी शैक्षणिक संकुलात गुणगौरव सोहळा

पारोळा येथील बालाजी शैक्षणिक संकुलात गुणगौरव सोहळा

googlenewsNext


पारोळा, जि.जळगाव : श्री.बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक, डॉ.व्ही.एम. जैन माध्यमिक व यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक तसेच एम.यु. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल या शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश करोडपती होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी, राजपूत समाजाचे राष्ट्रीय संघटक बाळासाहेब पाटील, संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर, संचालक मंगला करोडपती, मोहन बडगुजर, सुनील बडगुजर, आशिष बडगुजर ,जयकुमार धर्माधिकारी, प्रा.संजय बडगुजर, नीलेश बडगुजर, डॉ.चेतन बडगुजर, संकेत बडगुजर आदी उपस्थित होते.
या वेळी यु.एच.करोडपती यांच्या हस्ते रोशनी बहुद्देशीय संस्था, सोयगाव येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच भोजन पट्ट्या वितरित करण्यात आल्या. तसेच बालाजी शैक्षणिक संकुलातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षा, एम.टी.एस, शिष्यवृत्तीत गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच दहावी, व बारावीच्या परीक्षेतील यशस्वी झालेल्या १५० विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
चंद्रकात चौधरी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्पर्धात्मक परीक्षांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले, तर गोविंद शिरोळे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी विकासाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
रावसाहेब भोसले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरून बक्षिस रुपी थाप ठेवणे म्हणजे त्यांच्या पंखात बळ देणे असे होते, असे सांगितले.
उमेश करोडपती यांनी विद्यार्थी ज्ञान पिपासू असेल तर जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक विजय बडगुजर यांनी, तर शाळेच्या प्रगतीचा अहवाल मुख्याध्यापक हेमंत पाटील यांनी मांडला.
सूत्रसंचालन सुजित कंसारा, आभार नितीन बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रदीप चांदवडे, शैलेंद्र भावसार, किशोर महाजन, सूर्यकांत चव्हाण, परेश जैन, रोहित कोतकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Excellence in Balaji Educational Complex at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.