सहा वर्षीय बालिकेवर चुलत भावाकडून अति प्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:11 IST2020-08-09T22:10:20+5:302020-08-09T22:11:23+5:30

जामुनझिरा आदिवासी वस्तीवरील २० वर्षीय आदिवासी युवकाने त्याच्याच सख्ख्या चुलत सहा वर्षीय बहिणीवर अति प्रसंग केला.

Excessive incidents from a cousin on a six-year-old girl | सहा वर्षीय बालिकेवर चुलत भावाकडून अति प्रसंग

सहा वर्षीय बालिकेवर चुलत भावाकडून अति प्रसंग

ठळक मुद्देयावल तालुक्यातील जामुनझिरा आदिवासी वस्तीवरील घटनासंशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

यावल, जि.जळगाव : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तालुक्यातील जामुनझिरा आदिवासी वस्तीवरील २० वर्षीय आदिवासी युवकाने त्याच्याच सख्ख्या चुलत सहा वर्षीय बहिणीवर अति प्रसंग केला. यात बालिका गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वस्तीलगतच्या शेतात नेवून ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, जामुनझिरा या आदिवासी वस्तीवरील सहा वर्षीय बालिकेस संशयित आरोपीने केळी खाण्याचे आमीष दाखवले. तिला वस्तीलगतच्या केळीच्या बागेत नेवून अति प्रसंग केला. शनिवारी रात्री बालिकेच्या आईने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फौजदार सुनीता कोळपकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Excessive incidents from a cousin on a six-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.