कागदपत्रांच्या अदला बदलीने जिवंत महिलेला ठरविले मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:51 PM2020-09-06T12:51:54+5:302020-09-06T12:52:38+5:30
चुकीच्या संदर्भाने सर्वांनाच ताप
जळगाव : रुग्णसंख्या वाढणे व त्याचबरोबर नोंदणी, कागदपत्रे, अदलाबदली असे काहीसे प्रकार व यानंतरचा गोंधळ आता समोर येऊ लागला आहे़ भुसावळच्या मृतदेह अदलाबदली प्रकरणाला दिवस उलटत नाही तोच आणखी एक कागदपत्रांच्या अदलाबदलीचा प्रकार समोर आला़ पोलिसांनी नातेवाईकांना कळविण्यासाठी वडलीत फोन केला व महिला जिवंत असल्याचा उलगडा झाला़ ह्यलोकमतह्ण मुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला़
इकरा वैद्यकीय महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे़ या ठिकाणी आॅक्सिजनची व्यवस्था असल्याने मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना दाखल करण्यात येत असते़ मात्र, रुग्णांची प्रकृती खाल्यावल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयात संदर्भीत केले जाते़ रुग्णवाहिकेत रुग्णाला पाठविले जाते व त्यासोबत त्यांचा संदर्भ पत्र, रुग्णाची सर्व माहिती असणारे कागदपत्र दिली जातात़
इकराच्या कोविड हेल्थ सेंटरमधून शनिवारी पहाटे एका महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्या महिलेला रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले़ कोविड रुग्णालयात येईपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला होता़ रुग्णवाहिका चालकाने महिला व महिलेची कागदपत्रे सोपविली व परतला़ महिला मृत असल्याचे समजल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणीच नव्हते, अखेर
ह्यब्रॉड डेडह्ण म्हणून त्यांनी औद्योगिक वसाहत पोलिसांना कळविले़ दरम्यान, कागदपत्र चुकल्याचा घोळ समोर आला तेव्हा कोविड रुग्णालयात मात्र, गोंधळ उडाला हा मृतदेह नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला. तासाभरानेनंतर हा घोळ मिटला अन् साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
लोकमत प्रतिनिधीला फोन
कागदपत्रांवरून औद्योगिक वसाहत येथील हवालदार शिवदास चौधरी यांनी वडलीत नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो न झाल्याने त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींना फोन करून महिलेच्या नातेवाईकांना कळवा व पाठवून द्या, असा निरोप दिला़ ‘लोकमत’ प्रतिनिधीने तातडीने महिलेच्या नातेवाईकाला फोन लावला व मृत्यूचे सांगितले. मात्र, माझी आजी जिवंत आहे़ मी इकरा सेंटरलाच आहे़़़़़असे या मुलाने सांगितले व त्यानंतर जिवंत महिलेची कागदपत्र मृत महिलेसोबत गेल्याचा उलगडा झाला़ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कोविड रुग्णालयाला कळविले व त्यानंतर इकरा येथून परिचारिका आल्या व त्यांनी योग्य संदर्भ पत्र व कागदपत्रे दिली़ त्यानुसार संबधित मृत महिलेच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले.
रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता़ पाऊसही होता़ यात नजरचुकीने झालेला हा प्रकार आहे़ कुणीही हेतुपुरस्कर केलेले नाही़
-डॉ़ शांताराम ठाकूर, इकरा वैद्यकीय महाविद्यालय.