आरोग्य शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:31+5:302021-07-11T04:13:31+5:30
गरजू विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरच्या वर्धापन दिना निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ...
गरजू विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप
जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरच्या वर्धापन दिना निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष राजू तायडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोडे, महानगराध्यक्ष संजय निकम, आरपीआयचे महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष मोहन अढंगे, दादाराव हेरोळे, तालुका अध्यक्ष श्रावण सोनवणे, विलास बोरिकर, तालुकाध्यक्ष सुनील रायमोळे, जिल्हा सरचिटणीस संगीता दैया, प्रतिभा सोनवणे, संगीता मोरे,बन्सीलाल राजपूत,भगवान पाटील, अनिल अढंगे, मिलिंद भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मनपा समोर वाहतूक कोंडी
जळगाव : शनिवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले असतांना, त्यांच्या भेटीसाठी महापालिकेत आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच आपली वाहने उभी केली होती. यामुळे नेहरू चौक ते टॉवर चौक दरम्यान ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी उद्भवली. परिणामी नागरिकांना रस्ता ओलाडतांना तारेवरची कसरत करावी लागली.
सायंकाळी चारनंतरही चोरून लपून व्यवसाय सुरूच
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सायंकाळी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. असे असतानांही शहरातील सुभाष चौक, बेंडाळे चौक, पांडे चौक व नवीन बस स्थानक परिसरात अनेक विक्रेते चोरून-लपून व्यवसाय करतांना दिसून आले. विशेष म्हणजे बस स्थानक परिसरातील एका खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानावर नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली दिसून आली. या ठिकाणी फिजीकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला दिसून आला.
अखेर जिल्हा परिषदेकडून स्टेशनकडे जाणारा रस्ता खुला
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी गेल्या वर्षांपासून बंद केेलेला जिल्हा परिषदेकडून स्टेशनकडे जाणारा रस्ता संबंधित मक्तेदारातर्फे नुकताच सुरू करण्यात आला आहे. या रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. त्यामुळे हा रस्ता सुरू करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.