मू.जे.त ऑनलाईन वेबिनार उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:32+5:302021-03-13T04:29:32+5:30
होमगार्ड बांधवांना मानधन देण्याची मागणी जळगाव : महाराष्ट्रातील ५० वर्षांपुढील सर्व होमगार्ड स्त्री-पुरुष जवानांना कोरोना काळात तातडीने बंदोबस्त ...
होमगार्ड बांधवांना मानधन देण्याची मागणी
जळगाव : महाराष्ट्रातील ५० वर्षांपुढील सर्व होमगार्ड स्त्री-पुरुष जवानांना कोरोना काळात तातडीने बंदोबस्त द्यावा, अन्यथा कुटुंबांचा गाडा ओढण्यासाठी दरमहा मानधन द्यावे, अशी मागणी खान्देश एल्गार सामाजिक संघटनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण यांच्यासह बापूसाहेब हटकर, गणेश पाटील, संगीता देशमुख, वंदना राजपुत, मंजुषा शुक्ला, शुभांगी बिऱ्हाडे, कल्पना चित्ते, पंडित चौधरी, नीलेश बोरा, सैय्यद अकील पहेलवान आदी पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
युवाशक्ती फाउंडेशनला पुरस्कार
जळगाव : युवाशक्ती फाउंडेशनला कोरोना काळात सेवा बजावल्या बद्दल बारामती येथील युवाश्रम प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १५ मार्च रोजी बारामती येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती युवाशक्ती फाउंडेशनतर्फे प्रीतम शिंदे यांनी कळविली आहे.
मू.जे.महाविद्यालयात योग कार्यशाळा उत्साहात
जळगाव : मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे महिला दिनानिमित्त “योग : नारी शक्तीसाठी संजीवनी” या संकल्पनेंतर्गत सात दिवसीय नि:शुल्क ऑनलाईन योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जळगाव, पुणे , नाशिक, ठाणे, भंडारा, अहमदनगर, दिल्ली, अशा विविध ठिकाणाहून एकूण १०२५ महिलांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सं. ना. भारंबे, संचालक डॉ. देवानंद सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.