जळगावात नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:55 PM2018-12-31T18:55:51+5:302018-12-31T18:58:07+5:30

मावळत्या वर्षाच्या शेवटचा दिवस उगवताच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Excitement in the youth to welcome New Year in Jalgaon | जळगावात नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह

जळगावात नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह

Next
ठळक मुद्दे‘थर्टी फर्स्ट’साठी काही खास मेनूंचे नियोजनकाही हॉटेलमध्ये ५०० विविध पदार्थांची मेजवानीगैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानेही कसली कंबर

जळगाव : मावळत्या वर्षाच्या शेवटचा दिवस उगवताच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आहे. ‘थर्टी फर्स्ट’साठी शहरात हॉटेलचालकांकडून जोरदार तयारी केल्यानंतर तरुणांची वर्दळ वाढली आहे. नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या ‘सेलिब्रिटीं’ची बैठक व्यवस्था, खाद्य पदार्थांचा साठा, रोशणाई, संगीत व्यवस्थेसह आणखी काही वेगळे देण्यासाठी हॉटेलमालकांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. या सोबतच गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे.
जळगाव शहरातील काही लॉन व हॉटेलमध्ये ‘थर्टी फर्स्ट’ला दोन वेगवेगळ्या सेवेची तयारी केली आहे. लॉनवर खास ‘फॅमिली प्रोग्राम’ आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी मद्य तर राहणारच नाही शिवाय मद्यपीला प्रवेशही नाही. तेथे शाकाहारी जेवण, डी.जे., संगीत व्यवस्थेसह किडस् व कपल शोचेही आयोजन केले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात महिला व सर्वांचीच सुरक्षितता महत्त्वाची असल्याने हॉटेलचे वाढीव सुरक्षा रक्षकही तैनात राहणार आहेत. जवळपास ५०० जणांची व्यवस्था असलेल्या याठिकाणी ४० ते ४५ वेगवेगळे खाद्य पदार्थांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी प्रवेशासाठी आरक्षणाचीही (बुकिंग) व्यवस्था केली.

काही हॉटेलमध्ये ५०० विविध पदार्थांची मेजवानी राहणार आहे. यात पनीर तुफानी, पनीर मुसल्लम, चिकन अंगारा, चिकन रेश्मी यांचा समावेश राहणार आहे.
काही ठिकाणी तब्बल तीन दिवस म्हणजे ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी ‘न्यू ईअर स्पेशल मेनू’मध्ये पंजाबी, कॉन्टिनेन्टल, साऊथ इंडियन, चायनिज पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
अनेक हॉटेल चालकांनी शाकाहारी पदार्थांची वेगळी व्यवस्था केली असून त्यात ४० ते ४५ मेनू उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Web Title: Excitement in the youth to welcome New Year in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.