विवाह सोहळ्यात दारू आणल्यास बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:27 AM2020-01-13T00:27:53+5:302020-01-13T00:29:16+5:30

लग्न सोहळ्यात हळदीच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात जो दारू आणेल त्याच्यावर समाजाने बहिष्कार घालावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

Exclusion when bringing alcohol to a wedding ceremony | विवाह सोहळ्यात दारू आणल्यास बहिष्कार

विवाह सोहळ्यात दारू आणल्यास बहिष्कार

Next
ठळक मुद्देसोनाळा येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णयनिर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सुचवले

जामनेर, जि.जळगाव : लग्न सोहळ्यात हळदीच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात जो दारू आणेल त्याच्यावर समाजाने बहिष्कार घालावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
जामनेर येथे १९ जानेवारी रोजी होणाºया सकल मराठा समाज आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी समाजातर्फे ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. त्यातीलच एक बैठक सोनाळा, ता.जामनेर येथे दोन दिवसांपूर्वी पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.विवाहाच्या एक दिवस आधी हळदीच्या कार्यक्रमात दारू पाजली जाते. युवकांमध्ये खºया अर्थाने व्यसनाची सुरुवात येथूनच होते, असे समाजातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. बैठकीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा होत असताना व्यसनमुक्तीसाठी काही करता येईल का, असा विषय निघाला. तरुण व्यसनाकडे कसे वळतात याविषयी चर्चा करण्यात आली. एक कारण म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमात विनामूल्य मिळणारी दारू. गावातील तरुण दीपक पाटील, पंडित पाटील यांनी या विषयाला सुरुवात केली व ही वाईट प्रथा बंद करण्यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मांडले. बैठकीसाठी उपस्थित असलेले पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डॉ. प्रशांत पाटील, ग.स.संस्थेचे संचालक अनिल पाटील यांनी या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करून तुमचा या निर्णयाला पाठिंबा आहे का? असा थेट सवाल केला. गावाने आधीच दारूबंदीचा निर्णय घेतला आहेच. त्याचबरोबर विवाह सोहळ्यातील ही कुप्रथा बंद झालीच पाहिजे व त्यासाठी दारू पाजणाºया विवाह सोहळ्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची मागणी केली.विनोद पाटील, संदीप पाटील, दीपक ढोनी, डिगंबर पाटील, स्वामी टेलर, परमेश्वर देव उपस्थित होते.

विवाह सोहळ्यातील दारूपाजण्याची वाईट प्रथा रोखण्याचा क्रांतिकारी निर्णय सोनाळे गावातील तरुणांनी घेतला़ इतरांनीही याचे अनुकरण करावे़ - कमलाकर पाटील, माजी सरपंच, पाळधी, ता.जामनेर

विवाहाच्या आदल्या दिवशी हळदीच्या वरातीच्या वेळी दारू पाजण्याची प्रथा अयोग्यच आहे. यामुळे व्यसनाधीनता वाढून समाजाचे नुकसानच होते. सामाजिक बहिष्काराचा घेतलेला निर्णय कुप्रथा रोखण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. - डॉ. प्रशांत पाटील, राष्ट्रवादी कार्यकर्ते, जामनेर

Web Title: Exclusion when bringing alcohol to a wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.