लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विभागीय विक्री व्यवस्थापकास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:50 PM2019-09-16T23:50:52+5:302019-09-16T23:51:31+5:30
एकाला अटक : ३९ हजार २५० रूपयांची लांबविली रोकड
जळगाव- रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुंबईच्या मेहुल इंडस्ट्रीजच्या विभागीय विक्री व्यवस्थापक रोहिदास रूखमाजी गायकवाड यांच्याजवळील कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी ३९ हजार २५० रुपये लुटल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना एकाला अटक केली.
रोहिदास गायकवाड हे घाटकोपर येथेमेहुल इंटरप्रायझेस या कंपनीत विभागीय विक्री व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. कंपनीत अनब्रेकेबल फायबर प्लेटस, मेलामाईन प्लेटस असे तयार होते. हे विक्री करण्यासाठी रोहिदास हे प्रत्येक जिल्ह्यात जात असतात. नेहमीप्रमाणे ११ रोजी रोहिदास व त्यांच्यासोबत गिरी वाघेलाहे शहरातील व्यावसायिकांकडे आॅर्डर घेण्यासाठी आले. १२ रोजी काही व्यापाऱ्यांकडून आॅर्डर घेवून अॅडव्हान्स मिळालेली काही रक्कम घेवून ते रामनिवास लॉजवर थांबले. पुन्हा १३ सप्टेंबर रोजी पुजा केटर्स वजोशी केटर्स यांची आॅर्डर घेतली. यावेळी पूजा केटर्सचे रामचंद्र महाराज यांचेकडे बाकी असलेली ३९ हजार २५० रुपयांची रक्कम घेतली व रोहिदास हे एकटे पुन्हा रामनिवास लॉजवर परतण्यासाठी जळगाव, भुसावळ रस्त्यावरील हॉटेल प्रितम पार्कजवळ पायी चालत आले. हॉटेलजवळ थांबले असता, पांढºया रंगाची कार आली यात चालकासह पाच जण होते. त्यातील एकाने रोहिदास यांना रेल्वेस्टेशन जायचे का? प्रत्येकी १० रुपये सिटप्रमाणे पैसे लागतील असे सांगितले. रोहिदास चालकाच्या बाजूला सीटवर बसले असता, एकाने त्याच्या खिशातील ३९ हजार २५० रुपये काढून त्यांना गाडीच्या खालीलोटून दिले. यानंतर कार घेवून सर्व जण पसार झाले. यावेळी कारमधील संशयितांनी रोहिदास यांची बॅग बाहेर फेकून दिली. याबाबत गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले व सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
१९ पर्यंत पोलीस कोठडी
गायकवाड यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना कार थांबवून काही जण कुठे जायवयाचे अशी विचारणा करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, कॉ.सचिन पाटील, मुद्दस्सर काझी यांनी घटनास्थळ गाठले. चौकशी दरम्यान, मंगलराव खयालीराम राव (इदगाह मोहल्ला, उन्हैल नाल्याजवळ, उन्हैल, ता. नागदा, जि. उज्जैन) त्याच्यावर संशय बळाविल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून २ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.