मुलींसाठीही व्यायाम हा गरजेचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:19 PM2019-03-08T12:19:49+5:302019-03-08T12:20:00+5:30

-डॉ. विशाखा पाटील

Exercise is also needed for girls ... | मुलींसाठीही व्यायाम हा गरजेचा...

मुलींसाठीही व्यायाम हा गरजेचा...

Next


स्त्री शरीराच्या बाल्य, तरूणी, प्रौढा अशा अवस्था आहेत.बाल्य अवस्थेत तयार झालेले निरोगी शरीर पुढील आयुष्य सुलभ पार पडण्यास मदत करते. सध्याच्या काळात बालस्थौल्य ही एक मोठी समस्या आहे. पूर्वी शाळेत एखादे मूल जर जाड असेल तर सगळे त्याला चिडवत, आता जाड मुलांचीच संख्या जास्त आहे व बारीक कमी. त्यात मुलींचा विषय अधिक गंभीर झाला आहे. जंक फूड, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले असून परिणामत: मुलींमधील स्थौल्याचे प्रमाण वाढले आहे. स्थौल्य हे अनेक समस्यांचे मूळ आहे. हर्मोनल बदल होणे, पाळी न येणे ही समस्या त्यातीलच एक. परिणामस्वरूप पुढे जाऊन वंध्यत्त्व येतेच. त्याकरिता औषधींचा भडिमार व त्या औषधांचे दुष्परिणाम या दुष्टचक्रात मुली सापडतात. वजन वाढू न देणे हाच त्यावर उपाय होय. त्यासाठी मुलींचा आहार व जीवनशैली यात बदल करणे आवश्यक आहे. आरामदायी जीवनपद्धती दूर करून मुलींकडून व्यायाम करून घेणे गरजेचे आहे. भात, खिचडीचे प्रमाण कमी करून भाज्यांचे प्रमाण वाढवावे.
-डॉ. विशाखा पाटील, वैद्यकीय क्षेत्र. , जळगाव

Web Title: Exercise is also needed for girls ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.