ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने उमेदवारांसह निवडणूक यंत्रणेची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:14 PM2020-12-30T22:14:46+5:302020-12-30T22:15:56+5:30
बोदवड तालुक्यात अर्ज दाखल करताना बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याने निवडणूक यंत्रणेला मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात कामकाम पूर्ण करावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याने निवडणूक यंत्रणेला मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात कामकाम पूर्ण करावे लागले.
गत २४ तासांपूर्वी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बुधवारी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणी पाच वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली. तसेच ऑफलाइन नामनिर्देशनची सुविधा मिळाली. सायंकाळी पाच वाजता शहरातील वीजपुरवठा खंडित झाला व सात वाजेपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने तहसील कार्यालयामधील निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. सात वाजेपर्यंत उमेदवार व निवडणूक यंत्रणा नामनिर्देशनसाठी अंधारात मोबाइलच्या बॅटरी लावून नामनिर्देशन पत्र दाखल करून घेत होते. वीजपुरवठ्याचा खोळंबा झाल्याने निवडणूक यंत्रणेची धावपळ उडाली.