कडक उन्हापासून पपईची रोपे वाचविण्याची कसरत
By admin | Published: May 5, 2017 01:47 PM2017-05-05T13:47:41+5:302017-05-05T13:47:41+5:30
शेतक:याचा अनोखा प्रयोग : तळवाडेच्या शेतक:याने पिकाला केले पेपरचे अच्छादन
Next
ऑनलाईन लोकमत विशेष /दीपक पाटील
कापडणे, जि. धुळे, दि.4- जळगाव जिल्हयातील तळवाडे (ता.अमळनेर) येथील उपक्रमशील शेतकरी दिलीप आधार पाटील यांनी पपईच्या झाडांना कडक उन्हापासून वाचण्याविण्यासाठी वरून पेपरच्या कागदी टोप्या केल्या आहेत. सध्या 45 अंशार्पयत जिल्ह्याचे तापमान गेल्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतही पपईचे पीक जीवंत ठेवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.
रोपांना सावलीसाठी आच्छादन
पाटील यांनी स्वत:च्या सव्वा एकर जमिनीत पपईच्या रोपांची लागवड केलेली आहे. पपईचे रोपे कडक उन्हापासून जेमतेम तग धरून, वाढ खुंटत कोमजलेल्या ,करपलेल्या व मरनासन्न अवस्थेत उभी दिसत होती. यावर उपाय म्हणून पाटील यांनी सर्वप्रथम 8 ते 10 पपईच्या झाडांना उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली करण्याचा प्रय} केला असता अन्यत्र झाडांन पेक्षा सावलीची व्यवस्था केलेल्या झाडांची आठवडय़ा भरातच चांगल्या प्रमाणात टवटवीतपणा व झाडांच्या उंचीत वाढलेली निदर्शनास आले. ज्या झाडांना सावलीची सोय केलेली नव्हती त्या झाडांची उवाढत्या कडक 43 अंश सेल्सीयच्या उंची खुंडलेली दिसून आली.
790 रोपांची लागवड
त्यांनी शेतात 790 रोपांची लागवड केले आहे. पाटील यांनी प्रारंभी दहा लाईनीतील पपई रोपांना सावलीची सोय केल्यावर त्यांच्यात सुधारणा झाल्यावर शेतातील प्रत्येक पपईच्या झाडांना कागदाच्या रद्दीपासून टोप्या बनविल्या आहेत. सर्वत्र झाडांना कागदी टोप्या चढविल्याने येथील परिसरात कागदाच्या टोप्यांची शेती असा विषय चर्चिला जात आहे.