अपेक्षा अर्थसंकल्पाकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:09+5:302021-01-21T04:16:09+5:30
उत्तर : सुरुवात तर चांगली झाली. मात्र नंतर लाॅकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद राहिला व संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. लग्नसराई व ...
उत्तर : सुरुवात तर चांगली झाली. मात्र नंतर लाॅकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद राहिला व संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. लग्नसराई व अनेक मुहूर्त हुकल्याने ती भर कशी निघणार याचे आव्हान आहे.
२) गेल्या अर्थसंकल्पाने अपेक्षापूर्ती केली का? आपले अनुभव काय?
उत्तर : गेल्या अर्थसंकल्पात सुवर्ण व्यावसायिकांसाठी काहीच तरतूद नव्हती. त्यामुळे कर कमी होऊ शकले नाही की कोणत्या योजनांचा लाभ मिळाला नाही.
३) यंदाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा काय?
उत्तर : जीएसटी दर कमी करावा तसेच सेसही कमी करण्यात यावा. या शिवाय रोख खरेदीसाठी असलेली मर्यादा वाढवावी.
१) २०२०-२१ हे आर्थिक वर्ष कसे गेले? काय आव्हाने आहेत?
उत्तर : कोरोनाच्या संकटामुळे जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू असल्याने इतर व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला. विस्कळीत झालेले व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचे सर्वांसमोर आव्हान आहे.
२) गेल्या अर्थसंकल्पाने अपेक्षापूर्ती केली का? आपले अनुभव काय?
उत्तर : काही प्रमाणात अपेक्षापूर्ती झाली. मात्र जीएसटीसंदर्भात ज्यांची आर्थिक उलाढाल पाच कोटींच्या खाली आहे, अशा व्यापाऱ्यांविषयी निर्णय घेणे अपेक्षित आहे.
३) यंदाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा काय?
उत्तर : कृषी मालाला योग्य भाव मिळावा व आधारभूत किंमतीचाही लाभ व्हावा, यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. यात कृषी मालाला भाव मिळण्यासाठी खरीप हंगामात धान्य, कडधान्याची आयात करून नये. यासाठी वेगळी तरतूद करावी.