महागडे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:02 PM2019-06-19T12:02:47+5:302019-06-19T12:03:20+5:30
आजची शिक्षण प्रणाली खूपच महागडी झालेली आहे
आजची शिक्षण प्रणाली खूपच महागडी झालेली आहे. मला आठवतंय इयत्ता पाचवी ते दहावी मी जुनी पुस्तके घेऊन अभ्यास केलेला आहे. आत्ता तर जुन्या पुस्तकांचा प्रश्नच येत नाही. सध्या चांगल्या शाळेत शिक्षण घेणे सामान्य माणसाला शक्य नसल्याची परिस्थिती आहे. मला नाही आठवत की शालेय फी साठी मला सुरुवातीलाच काय परंतु दहावी पर्यंत हजार रुपये लागले आहेत. आता तर शाळेत प्रवेश घेण्यासाठी सहा हजार किंवा त्याही पेक्षा अधिक रक्कम भरावी लागत आहे. याला पालक की आजची समाजव्यवस्था या पैकी कोण जबाबदार आहे, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. महागड्या शिक्षण पद्धतीवर पर्याय काय? शासन पातळीवर याचा विचार होणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती असेल तर गरीबांची मुले शिक्षण घेणार काय, त्यांना ते परवडेल काय? याचा कोठेतरी विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण तज्ज्ञांनी यात काही शिफारशी कराव्यात असे यानिमित्त मला वाटते.
- सतीश जैन, अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ .