कृतिशिल राहून अनुभव घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:47+5:302021-05-28T04:12:47+5:30
जळगाव : पुस्तक वाचून धम्माचा अनुभव घेता येत नाही तर स्वतः कृतीशील राहून अनुभव घ्यावा लागतो. जेव्हा कर्तव्य केले ...
जळगाव : पुस्तक वाचून धम्माचा अनुभव घेता येत नाही तर स्वतः कृतीशील राहून अनुभव घ्यावा लागतो. जेव्हा कर्तव्य केले जाते तेव्हाच बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. आपल्याकडे लोक कर्तव्य न करता केवळ बोलत असतात, असे प्रतिपादन भन्ते विनय बोधीप्रिय यांनी केले.
फुले–शाहू-आंबेडकर विचारमंच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अजिंठा हौसिंग सोसायटी तसेच फुले–शाहू-आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भगवान तथागताने अंतरिक सौंदर्य वाढविण्यास सांगितले आपण मात्र बाह्य सौंदर्य वाढविण्यावर भर देतो. हे बाह्य सौंदर्य नष्ट होणारे असते. भारतीय माणूस खाण्या - पिण्यात, कपड्या लत्यात, दाग -दागिन्यात पैसा व्यर्थ खर्च करतो. त्यामुळे त्याचे दान कार्य दबलेले आहे. तर भारतीय माणसांच्या तुलनेत परदेशी लोक भौतिक सुखाला त्यागून मोठ्या प्रमाणात दान करतात, असे त्यांनी सांगितले.