मंकी ब्रिज, रोप क्लायबिंगसह रोप क्रॉसिंगचा अनुभवला थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:22 PM2019-11-18T18:22:27+5:302019-11-18T18:22:36+5:30
स्काउट-गाईड शिबिर : मध्यप्रदेशात विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण
जळगाव- टनेल क्रॉसिंग...पॅरेलल रोप... मंकी ब्रिज आणि रॉप क्रॉसिंगसह विविध साहसी खेळांचा विवेकानंद प्रतिष्ठान संचलित बग़ो़ शानभाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थरारक अनुभवला़ निमित्त होते मध्य प्रदेशातील पंचमढी येथे आयोजित पाच दिवसीय स्काउट-गाईड शिबराचे.
पाच दिवशीय शिबिरासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाअंजली महाजन व उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे यांचे मार्गदर्शन होते. यावेळी शिबिरात इयत्ता नववीतील ७४ स्काऊट, ३३ गाईड आणि ११ शिक्षक यांचा समावेश होता़ दरम्यान, शिबिरासाठी राष्ट्रीय स्काऊट आणि गाईड साहसी केंद्राचे एस.एस.रॉय आणि बिलकिस शेख यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
धनुर्विद्यासह रायफल शुटींगचेही घेतले धडे
शिबिरासाठी १५ टेंटची उभारणी करण्यात आली होती़ प्रथम दिवशी टेंट सजावट व फूड विदाउट फायर ही स्पर्धा घेण्यात आली़ नंतर दुसऱ्या दिवशी अडथळयांचे खेळ जसे टायर स्विंग, टनेल क्रॉसिंग, पॅरेलल रोप, मंकी क्रौलिंग, टायर वाक, बॅलेन्सिंग अपॉन पेज, रोप क्लायमबिंग, बीम क्लायमबिंग, बॅलेन्सिंग झुला, स्विंग जंप, मंकी ब्रिज, टायरक्लायमबिंग, चिमणी क्लायमबिंग, रोप क्रॉसिंग आणि मंकी रोलिंग असे खेळ तसेच साहसी खेळांमध्ये धनुर्विद्या, रायफल शुटींग, घोडेस्वारी, रॉक क्लायमबिंग आणि रॅपलिंग असे साहसी खेळांचा अनुभव घेतला.
ऐतिहासिक स्थळांना भेटी
ऐतिहासिक व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास व्हावा यासाठी अनेक स्थळांना भेटी देऊन त्या स्थळांची विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. यात प्रामुख्याने डॉ. राजेन्द्रप्रसाद उद्यान, मिड पॉईंट, गुप्त महादेव मंदिर, बडा महादेव मंदिर, जटाशंकर मंदिर, हांडी खो, पांडवलेणी उद्यान व अंबाबाई मंदिर या स्थळांचा समावेश होता. पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेले वेगवेगळे पर्वतांचे आकार, बदललेले खडकांचे आकार, रंग, दगडांवरील शैवाल ही भौगोलिक माहितीही विद्यार्थ्यांना येथे मिळाली. तसेच पाण्यावर तरंगणारा अद्भूत दगडही विद्यार्थ्यांनी येथे बघितला.