जळगावकरांनी अनुभवला ‘झिरो शॅडो डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:31 PM2019-05-26T12:31:25+5:302019-05-26T12:37:13+5:30

भाऊंच्या उद्यानात प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी

experience to 'Zero Shadow Day' | जळगावकरांनी अनुभवला ‘झिरो शॅडो डे’

जळगावकरांनी अनुभवला ‘झिरो शॅडो डे’

Next

जळगाव : माणसाची साथ त्याची सावली कधीच सोडत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. यासावलीची एक अनुभूती रविवारी खगोलप्रेमींसोबत अनुभवता आली. रविवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी सावली गायब झाली. ही सावली कशी गायब होते, हे पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी भाऊच्या उद्यानात प्रात्याक्षिकाची व्यवस्था केली होती.
या भौगोलिक घटनेचा अनुभव घेता यावा म्हणून जळगावातील खगोल प्रेमी अमोघ जोशी यांनी भाऊंच्या उद्यानात प्रात्याक्षिकाद्वारे ही संधी उपलब्ध करुन दिली होती. या ठिकाणी सौर घड्याळ (सनडायल) ही ठेवण्यात आले होते. त्याव्दारे स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी ‘शून्य सावली क्षण’कसा होतो हे प्रात्यक्षिकाव्दारे दाखविण्यात आले. हा एक वेगळा अनुभव खगोलप्रेमींनी अनुभवला.
काय आहे ‘झिरो शॅडो डे’
भूतलावरील प्रत्येक शहर हे वेगवेगळ््या अक्षांशावर वसले असून, जळगाव शहर हे २१.०० अंश उत्तर या अक्षांशावर आहे. तसेच कर्कवृत्ताच्या जवळ आहे. दरवर्षी २१ मार्च ते २१ जून या काळात २६ मे रोजी सूयार्चे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून दरवर्षी जळगाव शहरात १२ वाजून २५ मिनिटांनी ‘झिरो’ शडो डे’ असतो. या दिवसाला शून्य सावली दिवसही म्हणतात. २१ जून नंतर परतीच्या प्रवासात १८ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे शून्य सावली दिवस असतो.

Web Title: experience to 'Zero Shadow Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव