चार वर्षापूर्वीच्या खुनाचे रहस्य उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:22 AM2018-05-24T00:22:52+5:302018-05-24T00:22:52+5:30

चाळीसगाव : तीन जणांना अटक; एक फरार, प्रेमसंबंधातून करण्यात आला होता खून

 Explain the secret of the murder of four years ago | चार वर्षापूर्वीच्या खुनाचे रहस्य उघड

चार वर्षापूर्वीच्या खुनाचे रहस्य उघड

Next

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : तालुक्यातील जामडी शिवारातील विहिरीत चार वर्षापूर्वी बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस कोठडीत असलेल्या एका प्रकरणाची चौकशी करीत असताना या आरोपीसह चौघांनी खून करून विहिरीत फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. यातील एक आरोपी फरार असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहर पोलीस ठाणे हद्दीत सागर श्रावण पांचाळ याच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी विचारपूस करीत असताना त्याने नागर, ता.कन्नड येथील भागवत लक्ष्मण पाटील यांचा १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मुकेश उर्फ नाना जयवंत ठाकूर (वय ३५, रा.चाळीसगाव), योगेश उर्फ आबा भरत चौधरी (वय २८, रा.चाळीसगाव) मनोज कोळी (रा.चाळीसगाव) यांच्या मदतीने जामडी शिवारातील मारोतीच्या मूर्तीजवळ असलेल्या बापू किसन परदेशी याच्या शेताच्या बांधावर दोरीने गळा आवळून भागवत पाटील यांचा खून केला होता. संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत छोट्या वाहनात टाकून तो चाळीसगाव येथे आणून घाटरोडवरील योगेश अग्रवाल यांच्या शेतातील विहिरीत प्रेत टाकून दिले होते, अशी कबुली सागर पांचाळ याने पोलिसांना दिली.
यावरून पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. गेल्या चार वर्षापूर्वी या घटनेत भागवत पाटील यांची ओळख पटली नसल्याने पोलीस रेकॉर्डवर दिसून आले. सागर पांचाळ यांच्या कबुली जबाबावरून सरकारतर्फे पोहेकॉ बापूराव भोसले यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अन्वये मुकेश उर्फ नाना जयवंत ठाकूर, योगेश उर्फ आबा भरत चौधरी याचेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून मनोज कोळी या फरार आरोपीचा पोलीस शोधाशोध घेत आहे.
खुनाचे कारण प्रेमसंबंधातून
मयत भागवत लक्ष्मण पाटील याच्या पत्नीशी मुकेश ठाकूर याचे प्रेमसंबंध होते. ही बाब कळाल्यावर पाटील याने मुकेशशी वाद घालून त्याला मारहाण केली होती. या वादाचा वचपा काढण्यासाठी मुकेश याने सागर पांचाळसह आबा चौधरी व मनोज कोळी तसेच भागवत पाटील यांना पार्टी दिली. तो एकटाच असल्याची संधी साधून त्यास जबर मारहाण करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास पो.नि. रामेश्वर गाडे- पाटील करीत आहे.

Web Title:  Explain the secret of the murder of four years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.