दरोडेखोरांच्या शोधासाठी काशी एक्सप्रेसला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:28 PM2018-11-06T21:28:58+5:302018-11-06T21:32:25+5:30
सायन-पनवेल महामार्गावर कारमधील चौघांनी कर्नाटकातील व्यापाऱ्यास मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून ५० लाखाचे सोने लुटले. संशयित दरोडेखोरे हे काशी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या एक्सप्रेस घेराव घालून संशयितांचा शोध घेतला. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर काशी एक्सप्रेस व रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
जळगाव : सायन-पनवेल महामार्गावर कारमधील चौघांनी कर्नाटकातील व्यापाऱ्यास मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून ५० लाखाचे सोने लुटले. संशयित दरोडेखोरे हे काशी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या एक्सप्रेस घेराव घालून संशयितांचा शोध घेतला. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर काशी एक्सप्रेस व रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
दरम्यान, या गाडीला फक्त तीन मिनिटांचा थांबा असल्याने पोलिसांचा ताफा याच गाडीतून भुसावळपर्यंत गेला. जळगाव ते भुसावळ दरम्यान व भुसावळ स्थानकावर दहा ते बारा अधिकारी व शेकडो कर्मचाºयांनी तपासणी केल्यानंतरही दरोडेखोर सापडले नाहीत.
महामार्गावर थांबणे पडले महागात
संतोष मोतीलाल मुरकुंबी (वय ४४, रा.नार्वे गल्ली, शाहपूर, बेळगाव, कर्नाटक) हा व्यापारी सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता ५० लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोने व दहा हजार रुपये रोख घेऊन बेळगावला जात असताना सायन-पनवेल महामार्गावर मॅकडनोल्ड हॉटेल समोरील थांब्यावरुन एका पांढºया रंगाच्या कारमध्ये बसला. या कारमध्ये आधीच चार जण होते. एकाने दोन्ही हातांनी डोळे घट्ट दाबले तिघांनी बेदम मारहाण ऐवज लांबविला.
चाळीसगाव येथे दुपारी एक वाजता अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाºयांना सोबत घेऊन सर्व बोग्यांची तपासणी केली.त्यानंतर जळगाव स्थानकावर उपअधीक्षक सचिन सांगळे व सहकाºयांनी तपासणी केली.