टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ११ लाखांचा गंडा घालणा-या टोळीचा पर्दाफाश

By सागर दुबे | Published: May 2, 2023 05:37 PM2023-05-02T17:37:35+5:302023-05-02T17:37:45+5:30

 टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली जळगावातील डॉ. उल्हास बेंडाळे यांची ११ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कोलकाता येथून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Exposed gang who cheated 11 lakhs in the name of tour and travels | टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ११ लाखांचा गंडा घालणा-या टोळीचा पर्दाफाश

टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ११ लाखांचा गंडा घालणा-या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

जळगाव :  टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली जळगावातील डॉ. उल्हास बेंडाळे यांची ११ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कोलकाता येथून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून आठ मोबाईल, तीन संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप आणि आठ एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले असून रिकार्डो क्रिस्टफर गोम्स (३६), प्रियांशू सैवाल बिसवास (२३), अनिकेत अभिजित बिसवास (२४, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या सायबर ठगांची नावे आहेत.

डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांचे दहा सहका-यांना सेव्हर सिस्टर पाहण्यासाठी जायचे होते. त्या अनुषंगाने त्यांनी फेसबुकवर थींकट्रीप ट्रॅव्हल्स या नावाची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने ॲडव्हान्स ३ लाख १५ हजार रूपये तसेच टूर बुक झाली म्हणून ७ लाख २० हजार रूपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी ६८ हजार ८०० रूपये असे लागतील सांगण्यात आले. त्यानुसार बेंडाळे यांनी ११ लाख ३ हजार ८०० रूपयांची रक्कम भरली. दरम्यान, काही दिवसांनी त्यांचे बुकींग झालेच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी १३ मार्च २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषणानंतर ठगांची मिळाली माहिती

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले कॉल, व्हॉटस्ॲप मेसेज, ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले त्यांची माहिती घेवून सायबर ठगांचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे ठग कोलकाता येथे असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ. राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांचे पथक ठगांच्या शोधार्थ रवाना झाले. रविवारी रिकार्डो क्रिस्टफर गोम्स, प्रियांशू सैवाल बिसवास, अनिकेत अभिजित बिसवास या तिघांना अटक करून पथक जळगावात दाखल झाले. त्यांच्याजवळून मोबाईल, संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप, एटीएम कार्ड, चेकबुक तसेच एक शिक्का आदी जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Exposed gang who cheated 11 lakhs in the name of tour and travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.