जोखीमेचे काम करणाऱ्यां प्रति कजगावात व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 02:11 PM2021-04-23T14:11:19+5:302021-04-23T14:12:47+5:30

जोखीमेचे काम करणाऱ्यां प्रति कजगावात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Expressed gratitude to those who took the risk | जोखीमेचे काम करणाऱ्यां प्रति कजगावात व्यक्त केली कृतज्ञता

जोखीमेचे काम करणाऱ्यां प्रति कजगावात व्यक्त केली कृतज्ञता

Next

कजगाव, ता.भडगाव : कोरोना काळात वर्षभरापासून अति जोखीममध्ये काम करणारे वैद्यकीय विभाग, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आजही तेवढ्याच जोखीम काम करत आहे. या जोखीमचे महत्त्व कळत असल्याने २२ रोजी सायंकाळी कजगावात बसस्थानक चौकात तहसीलदार, फौजदारसह महसूल, पोलीस, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने रिकामटेकड्याची धरपकड करत असताना कजगाव येथील नवकार मेडिकलचे मालक तसेच तालुका मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील ललवाणी यांनी या ठिकाणी उपस्थित प्रशासनातील साऱ्याच मान्यवरांना मास्क भेट देत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. 
शासनाने घालून दिलेले निर्बंध काटेकोरपणे पालन करावे यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासन रात्रंदिवस मेहनत करत आहे. भडगाव तालुक्यातदेखील याचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भडगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाबरोबरच मोठी बाजारपेठ असलेल्या कजगावातदेखील याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी २२ रोजी स्वत: तहसीलदार सागर ढवळे, फौजदार सुशील सुशील सोनवणेंसह पोलीस, महसूल, ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते. दरम्यान, कजगाव येथील नवकार मेडिकलचे मालक यथा तालुका मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील ललवाणी यांनी उपस्थित  प्रशासनातील सर्वांना मास्क देत कृतज्ञता व्यक्त केली.
  

Web Title: Expressed gratitude to those who took the risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.