कंडारेची हकालपट्टी, चैतन्य नासरे बीएचआरचे नवे अवसायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:34+5:302021-01-22T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट क्रेडीट को. ऑफ सोसायटीचा अवसायक जितेंद्र कंडारे याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट क्रेडीट को. ऑफ सोसायटीचा अवसायक जितेंद्र कंडारे याची मुदत २५ जानेवारी रोजी संपणार होती. मात्र त्या आधीच केंद्र शासनाने त्या जागी को. ऑप सोसायटीजचे सहायक रजिस्ट्रार चैतन्य नासरे यांची निवड केली आहे. त्यासोबतच नेमणुक केल्याच्या तारखेपासून वर्षभराच्या आत बीएचआरच्या अवसायनाची प्रक्रियादेखील पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे याच्याविरोधात पुणे येथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला. कंडारे याची अवसायक म्हणून काम करण्याची मुदत २५ जानेवारी २०२१ ला संपणार होती. मात्र आता केंद्र शासनाच्या कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने कंडारेची हकालपट्टी केली आहे आणि त्या जागी नासरे यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय सहकार निबंधकांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले आहे.