२५ जानेवारीपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:17 AM2021-01-20T04:17:01+5:302021-01-20T04:17:01+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपली असली तरी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरुन २५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
कोरोनामुळे सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. प्रथम वर्षाचे ऑनलाईन वर्ग १ सप्टेंबरपासून सुरु झाले आहेत व उर्वरीत अभ्यासक्रमाचे वर्ग १ ऑगस्ट पासून ऑनलाईन सुरु आहेत. महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया देखील संपली आहे. परंतु काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे केलेली विनंती लक्षात घेऊन बीए, बीकॉम, बीएस्सी प्रथम, व्दितीय, तृतीय वर्ष तसेच एमए, एमकॉम, एमएसडब्ल्यू या वर्गाना प्रवेश घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी २५ जानेवारी पर्यंत प्रवेश देण्यात यावा असे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाच्यावतीने करण्यात आलेले आहे.