जिल्हा बँकेतर्फे पिक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:09 PM2020-03-31T23:09:59+5:302020-03-31T23:10:28+5:30

शेतकऱ्यांना दिलासा

Extension of loan loan repayment by District Bank | जिल्हा बँकेतर्फे पिक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

जिल्हा बँकेतर्फे पिक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

Next

जळगाव : शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज परतफेडीस जिल्हा बँकेतर्फे मुदतवाढ देण्यात आली असून ३१ मेपर्यंत शेतकºयांना आपले कर्ज भरता येणार आहे.
दरवर्षी बँकांकडून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येते. तसेच कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकºयांना ३१ मार्चपर्यंतची मुदत असते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून राज्य व केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या बहुतांश व्यवहारांना मुदतवाढ दिली जात होती. त्यानुसार शेतकरी कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी, यासाठी जिल्हा बँकेतर्फे केंद्र सरकार, राज्य सरकार नाबार्ड यांच्याशी पत्रव्यवहार करून सदर मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी जिल्हा बँकेला परवानगीचे पत्र मिळाले व मे २०२०अखेर पिक कर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली. तसे पत्र जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी काढले आहे.
असे असले तरी ज्या शेतकºयांना आताही कर्ज भरायचे असल्यास ते भरु शकतील, असे बँकेच्यावतीने सांगण्यात आले. या सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळासाठी तसेच गटसचिवांसाठी जिल्हा बँकेने कर्ज मागणीचे नवीन प्रस्ताव न मागवता मागील वर्षीच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतलेला आहे, अशी माहिती जिल्हा बँक व पणन महासघाचे संचालक संजय पवार यांनी दिली.

Web Title: Extension of loan loan repayment by District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव