जळगावात रेल्वेत चढताना चप्पल अडकल्याने विस्तार अधिकाऱ्याचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:59 AM2018-08-22T11:59:34+5:302018-08-22T12:00:14+5:30
सपकाळे कुटुंबावर कोसळले संकट
जळगाव : मुंबईकडून भुसावळकडे जाणाºया कामायनी एक्सप्रेसमध्ये चढताना पायºयांमध्ये अडकलेली चप्पल काढताना तोल जावून पडल्याने विजय यशवंत सपकाळे (वय ५५, रा.भुसावळ मुळ रा. किनगाव, ता.यावल) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर घडली.
सपकाळे हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्तार अधिकारी म्हणून नोकरीला होते.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय सपकाळे हे भुसावळ येथून रेल्वेने ये-जा करतात. मंगळवारी दिवसभराचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी घरी जाण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील मनिष चव्हाण यांनी त्यांना दुचाकीने रेल्वे स्टेशनवर सोडले. साडे सात वाजता कामायनी एक्सप्रेसमध्ये चढताना त्यांची एक चप्पल पायºयांमध्ये अडकली. ती काढताना रेल्वे गाडी सुरु झाली व त्यात तोल जावून ते प्लॅटफार्म व रेल्वेमधील अंतरात पडले. हा प्रकार लक्षात येताच सहप्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. कार्यालयातील सहकारी व सोबत भुसावळ येथून ये-जा करणारे शशिकांत सुरवाडे व सहकाºयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. डोक्याला मार लागल्याने वैद्यकिय अधिकारी डॉ.अर्जुन सुतार यांनी त्यांना मृत घोषीत केले.
उपोषण सोडविण्यासाठी केले प्रयत्न
सायगाव, ता.चाळीसगाव येथील एक कुटुंब जिल्हा परिषद सदस्याच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहे. मंगळवारी बहुतांश अधिकारी नसल्याने सपकाळे यांनीच हे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर कामकाज आटोपून ते सायंकाळी भुसावळ जाण्यासाठी निघाले.
उपोषण सोडून घरी येतो...
सपकाळे यांनी घरी जाण्यापूर्वी पत्नी लता यांना फोन केला होता. उपोषण सोडवायचे आहे, ते सुटले की मी लगेच घरी येतो असे त्यांनी सांगितले. सपकाळे यांचा मृतदेहच घरी नेण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली. दरम्यान, पत्नी लता, मुलगा गौरव व शुभम यांनी जिल्हा रुग्णालयात सपकाळे यांचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.
सहका-याचा वाढदिवस केला साजरा
ग्रामपंचायत विभागात सपकाळे यांच्यासोबतच कामाला असलेले वरिष्ठ लिपिक शशिकांत सुरवाडे यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस कार्यालयातील सहकाºयांनी दुपारी आनंदात साजरा केला. सुरवाडे हे सपकाळे यांचे जिवलग मित्र व दोन्ही भुसावळ येथूनच रेल्वेने अपडाऊन करतात. ही घटना घडली तेव्हा सुरवाडे दुसºया बोगीत होते. डॉक्टरांनी मृत घोषीत करताच सुरवाडे यांनाही मोठा धक्का बसला. अन्य सहकाºयांनी त्यांना धीर देत सावरले.