स्वीकृत नगरसेवकांना मार्चपर्यंत मुदतवाढ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:04+5:302020-12-14T04:31:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपातील सत्ताधारी भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सूचना देवूनही राजीनामे ...

Extension of sanctioned corporators till March? | स्वीकृत नगरसेवकांना मार्चपर्यंत मुदतवाढ ?

स्वीकृत नगरसेवकांना मार्चपर्यंत मुदतवाढ ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - मनपातील सत्ताधारी भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सूचना देवूनही राजीनामे दिलेले नाहीत. यामुळे अनेक महिन्यांपासून इच्छुक असलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मार्च महिन्यापर्यंत राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे इतर नगरसेवकांनी देखील आपले राजीनामे मार्च महिन्यापर्यंत न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाने देखील आता मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे.

भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर चार स्वीकृत नगरसेवकांना पक्षाने संधी दिली होती. तसेच प्रत्येक नगरसेवकाला वर्षभराचा कार्यकाळ देण्यात आला होता. मात्र, अडीच वर्ष कार्यकाळ झाल्यानंतरही स्वीकृत नगरसेवकांचे पक्षाने राजीनामे न घेतल्याने इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे.

कोट..

पक्षाने आदेश दिले होते. मात्र, मध्यंतरी पक्षाचे काही मेळावे, कार्यक्रम, विधानपरिषदेची निवडणूक यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. याबाबत पक्षाकडून लवकरच निर्णय घेण्याचा प्रयत्न राहिल.

-दीपक सुर्यवंशी, महानगराध्यक्ष, भाजप

Web Title: Extension of sanctioned corporators till March?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.