परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:16+5:302021-05-12T04:16:16+5:30

जळगाव : सध्या टाळेबंदीचा काळ असल्यामुळे विध्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यास दहा ...

Extension should be given for filling up the examination form. | परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी..

परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी..

Next

जळगाव : सध्या टाळेबंदीचा काळ असल्यामुळे विध्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यास दहा दिवस अधिकची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड.कुणाल पवार यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अगोदरच विद्यार्थ्यांकडे पैशाची चणचण आहे. अनेक सायबर कॅफे बंद आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाइल फोन नाहीत. तसेच दुसरीकडे ऑनलाईन परीक्षा होत असल्याने विद्यापीठमध्ये स्टेशनरीची सुध्दा गरज पडत नाही. परंतु तरी देखील परीक्षा फी तेवढीच आकारली जात आहे. त्यामुळे ही परीक्षा फी देखील कमी करावी व ज्या विद्यार्थ्यानाच्या घरात कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर अशा विद्यार्थ्याची वर्गाची फी न आकारता त्याला मोफत परीक्षा फॉर्म भरू द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Extension should be given for filling up the examination form.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.