महिला रुग्णालयात कोविड रुग्णांना सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:37+5:302021-03-31T04:16:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांना जिल्ह्यात बेड मिळत नाहीत, आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांना जिल्ह्यात बेड मिळत नाहीत, आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा करून मोहाडी रस्त्यावरील महिला रुग्णालयात अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या ठिकाणी ३०० रुग्णांना सुविधा मिळणार आहे.
शहरात एकाच ठिकाणी अतिशय उत्तम व्यवस्था उपलब्ध होईल असा पर्याय नसल्यामुळे मोहाडी रोडवर उभारण्यात आलेल्या महिलांच्या रूग्णालयात पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. काही दिवस आधी पालकमंत्र्यांनी या रुग्णालयाची पाहणी केली होती. तेथे कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. तर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या हॉस्पिटलची पाहणी करून प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर मंगळवारी पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांची चर्चा झाली.