ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:30 PM2019-06-27T13:30:30+5:302019-06-27T13:31:17+5:30
ज्येष्ठांना राष्टÑीय संपत्तीचा दर्जा देऊन त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे
संपूर्ण आयुष्यभर कष्ट व मेहनत करून देशाच्या प्रगतीला ज्येष्ठांनी हातभार लावला आहे. आपल्या रक्ताचे पाणी करून जीवापाड मेहनत घेतलेली आहे. म्हणून ज्येष्ठांना राष्टÑीय संपत्तीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्याची, त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांना लागणाऱ्या औषधीमध्ये सूट देण्याची गरज आहे. ज्येष्ठांना मानधन म्हणून दरमहा कमीत कमी १० हजार रूपये पेन्शनच्या स्वरूपात रक्कम द्यावी. ज्यांना स्वत:चे घर नाही, अशा ज्येष्ठांना सवलतीच्या दरात निवारा निर्माण करून दिला पाहिजे. मुलभूत गरजा म्हणून एवढ्या तरी सवलती राज्य सरकारने दिल्या पाहिजेत. हे सरकारचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये. ज्येष्ठांना सुखाने जीवन जगता यावे म्हणून राज्य वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ व इतर संघटनांनी ज्येष्ठांच्या मागण्यांसाठी दिल्लीत मोर्चा काढून उपोषणही केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले. या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करीत आक्रोशही केला. सतत-सतत आक्रोश करून आज ज्येष्ठ नागरिक थकून गेलेला आहे. घशातून आवाज निघत नाही. लढण्यासाठी पुरेशी ताकद अंगात नाही. असे असूनसुद्धा ज्येष्ठांनी आपला लढा सुरूच ठेवलेला आहे. जवळ-जवळ १० ते १५ वर्षांपासून सतत संघर्ष सुरू आहे. ही परिस्थिती सरकार डोळ्याने पाहत आहे. परंतू निर्णय घेत नाही. ज्येष्ठांचा कुठलाही विचार करीत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. सरकार एकप्रकारे ज्येष्ठांची थट्टाच करीत आहे. े.
-रमेश खैरनार, कार्यालयीन अध्यक्ष, वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ, जळगाव.