महामंडळातर्फे विद्यार्थांना शैक्षणिक पासेसची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:52+5:302020-12-23T04:13:52+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून जळगाव आगार प्रशासनातर्फे या विद्यार्थांना शैक्षणिक पासेस ...
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून जळगाव आगार प्रशासनातर्फे या विद्यार्थांना शैक्षणिक पासेस वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी आठ पासून ते सायंकाळी सहापर्यंत विद्यार्थांना पासेस वितरित करण्यात येत आहेत. यासाठी दोन कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडूनच पासचे शुल्क घेण्यात येत असून, मुलींना शासनाच्या सुचनेनुसार मोफत पास देण्यात येत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
स्मार्ट कार्डसाठी स्वतंत्र रिचार्चची व्यवस्था
गेल्या वर्षापासून महामंडळातर्फे स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात आले असून, अनेक विद्यार्थांनी स्मार्ट कार्ड काढले आहेत. त्यामुळे या विद्यार्थांना रांगेत उभे राहून कागदी पास घेण्याची गरज नाही. स्मार्ट कार्डमुळे या विद्यार्थांना आगारात पासचे जितके शुल्क, तितक्या रकमेच्या रिचार्जची व्यवस्था आगारात करण्यात आली आहे.