घटस्थापनेचा मुहूर्त : ६०० दुचाकी व २०० चारचाकींची होणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:55 AM2019-09-28T11:55:06+5:302019-09-28T11:55:32+5:30

एलईडीलाही चांगली मागणी, सुवर्ण बाजारातही दिसणार उत्साह

Facilitator of sale: Two-wheeler and two-wheeler sale | घटस्थापनेचा मुहूर्त : ६०० दुचाकी व २०० चारचाकींची होणार विक्री

घटस्थापनेचा मुहूर्त : ६०० दुचाकी व २०० चारचाकींची होणार विक्री

Next

जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ६०० दुचाकी तर २०० चारचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात या वेळी एलईडी, वाशिंग मशिनला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. पितृपक्ष संपताच सुवर्ण बाजारातही खरेदीचा उत्साह दिसून येणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहे.
साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंचे बुकिंग केलेले आहे. घटस्थापनेचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी बुकिंग करून ठेवले असून त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
योजनांचा अधिक फायदा
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ््या योजना राबविल्या जात आहे. अर्थसहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्सचेंज आॅफरही असल्याने याचाही ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट असून ग्राहकांना फायदा होत आहे.
चारचाकींना वाढली मागणी
चारचाकींच्या बाजारात मोठी धूम दिसून येत असून घटस्थापनेच्या मुहुर्तावर किमान २०० चारचाकी रस्त्यावर येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरातील एका शोरुमध्ये घटस्थापनेसाठी तब्बल १०० चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. इतर शोरुमचे मिळून एकूण २०० चारचाकींची विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चारचाकीमध्ये वाहने कमी पडल्यास ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे काही ग्राहकांना विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन घेता येऊ शकते, अशीही माहिती विक्रेत्यांनी दिली.
६०० दुचाकींची विक्री
शहरातील दुचाकीच्या एकाच शोरुमध्ये १२५ दुचाकींचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरुमचे मिळून किमान ६०० दुचाकींची विक्री होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये मोपेड गाड्यांना अधिक पसंती असल्याचेही विके्रत्यांनी सांगितले. दुचाकी बुकिंग करण्यासाठी रात्रीपर्यंत दुचाकींच्या दालनात गर्दी होत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारही गजबजला
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. एलईडीला अधिक पसंती दिसून येत आहे. त्या खालोखाल फ्रिज, वाशिंग मशिनला मागणी आहे. या वस्तूंचेच मोठ्या प्रमाणात बुकिंग झालेले आहे.

सुवर्ण खरेदीला येणार झळाळी
पितृपक्ष पक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी येणार असल्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांकडून दिले जात आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सुवर्ण बाजारात पितृपक्षामुळे खरेदीला पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता. मात्र पितृपक्ष संपून आता घटस्थापनेला सुवर्णबाजारात पुन्हा रेलचेल दिसणार आहे.


घटस्थानेपासून सुवर्ण खरेदीसाठी चांगला उत्साह राहणार आहे. पितृपक्षात खरेदीत पडलेला थोडा खंडही दूर होऊन पितृपक्षापेक्षा आता सोने-चांदीला चांगली मागणी वाढणार आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ बाजार असोसिएशन.

घटस्थापनेच्या मुहूर्तासाठी इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंना मागणी वाढणार असून त्यासाठी बुकिंगदेखील करून ठेवण्यात आले आहे. एलईडी, फ्रीज, वाशिंग मशिनला चांगली मागणी आहे.
- महेंद्र ललवाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर चारचाकींचे चांगले बुकिंग झालेले आहे. खरेदीसाठी आता ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे.
-उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.

दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून घटस्थापनेच्या मुहूर्तासाठी आमच्याकडे गर्दी होत आहे. दालनात दुचाकींच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

Web Title: Facilitator of sale: Two-wheeler and two-wheeler sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव