फॅक्टरीला आग, 30 जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: June 2, 2017 12:29 PM2017-06-02T12:29:42+5:302017-06-02T12:29:42+5:30

साकळी : वर्षभरापूर्वी दंगलीनंतर घडली होती घटना

Factory fire, crime against 30 people | फॅक्टरीला आग, 30 जणांविरुद्ध गुन्हा

फॅक्टरीला आग, 30 जणांविरुद्ध गुन्हा

Next

ऑनलाईन लोकमत

यावल,दि.2 - तालुक्यातील साकळी येथे गतवर्षी 14  जून रोजी युसुफखान नुरखान यांच्या मालकीच्या नूर प्लॅस्टिक फॅक्टरीस आग लावून 25 लाखांचे नुकसान झाले होत़े या प्रकरणी 30 जणांसह अन्य अज्ञात 15 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला. 
13 जून रोजी साकळी येथे पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात दंगल उसळली होती.  फॅक्टरीमालक युसुफखान नुरखान दंगलीतील संशयीत आरोपीपैकी एक संशयीत आरोपी होते. तालुक्यातील साकळी येथे गेल्या वर्षी 13 जून रोजी उसळलेल्या दंगलीनंतर दुस:या दिवशी युसुफखान नुरखान यांचा मालकिच्या नूर  प्लॅस्टीक फॅक्टरीस आग लावली होती. गुरूवारी फॅक्टरी मालक युसुफखान नुरखान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन  संशयीत आरोपी सैय्यद लियाकत सैय्यद समद, सैय्यद तय्यब सैय्यद ताहेर, सै. सादिक सै. अजीज, सै. शौकत सै. ताहेर, सै. अजगर सै. बिसमील्ला,  सै.अशपाक, सै. शौकत,  सै. अरमान सै. रज्जाक, सै. सादिक सै. समद, सै. मेहमूद सै. ताहेर, सै.शहारुक सै. युनुस, सै. इकबाल सै. अजीज, शेख अजरुद्यिन शे. रउफद्दिन,  शेख मुज्जम्मील शे. न्याजोद्दीन, साबिर सय्यद मुनसफजली, सै. शकील सै. कुरबान,  रउफोद्दीन शफिउद्दिन अन्वार उलहक रउफोद्दिन, न्याजोद्दिन शफिउद्दीन, शहाबोद्दीन रउफोद्दीन, सै. अलताफ  सै. अरमान, रियाज सै. ताहेबअली उर्फ पप्या, मोहसीन सै.बिसमिल्ला, सै.सद्याम सै.बिसमिल्ला, सै.आजाद सै. तय्यब,  सै. शहजाद सै. तैय्यब, अलीम सै. सलीम, सै.नूर सै.बिसमील्ला, सै.फरयान सै. इरफान, फैजान  सै.इरफान, सै.ईरफान सै. लुकमान यांच्यासह  अज्ञात 10 ते 15 जणांनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Factory fire, crime against 30 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.