काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 05:53 PM2019-09-11T17:53:50+5:302019-09-11T17:55:35+5:30

लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जाणाºया डाऊन काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला.

Failure of Kashi Express engine | काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Next
ठळक मुद्देपाचोऱ्याजवळ नांद्रा येथे प्रवाशांचा खोळंंबा रेल्वे प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून वाहतूक केली सुरळीत

सामनेर, ता पाचोरा, जि.जळगाव : नांद्रा, ता.पाचोरा येथून जवळच असलेल्या रेल्वेच्या नांद्रा-माहेजी गेट नं.१३५ जवळ बुधवारी दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जाणाºया डाऊन काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. यामुळे ही गाडी तत्काळ थांबवण्यात आली. परिणामी रेल्वे वाहतुकीचा काही वेळ खोळंबा झाला तर चाळीसगाव आणि पाचोरा येथून जळगावला अप-डाऊन करणाºया प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली आहे.
अधिक माहिती अशी की, ही रेल्वे गाडी आज नांद्रा-माहेजी गेटजवळून जात असताना इंजिनवर असलेल्या तारेला इंजिनशी जोडणाºया कनेक्टरमधून अचानकपणे आगीचे गोळे व धूर निघू लागल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने गाडी माहेजी स्टेशननजीक थांबवली. ही गाडी मुख्य मार्गावर अडकल्याने मागची वाहतूक खोळंबली. त्यातच चाळीसगाव आणि पाचोरा येथून जळगावला अप-डाऊन करणाºया प्रवाशांची मोठी अडचण झाल्याने त्यांनी बस वाहतुकीने जळगावला जाण्यासाठी नांद्रा स्थानकावर गर्दी केली होती.
दरम्यान, रेल्वेचालकाने भुसावळ येथे व्यवस्थापनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्याने त्याच मार्गावरून पाठीमागून येणारी मालगाडी थांबवून तिचे इंजिन एक्सप्रेसला जोडले व तिला पुढे रवाना करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Failure of Kashi Express engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.