फैजपुरात ईदनिमित्त नगरसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 02:23 PM2020-05-22T14:23:50+5:302020-05-22T14:25:00+5:30

ईदनिमित्त मुस्लीम समाजातील २०० कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख आणि शिरखुर्मा किट वाटप करून नगरसेवकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

In Faizpur, on this occasion, the corporator made a social commitment | फैजपुरात ईदनिमित्त नगरसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी

फैजपुरात ईदनिमित्त नगरसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी

Next
ठळक मुद्दे२०० कुटुंबांना ईदसाठी दिली भेटईद साजरी करण्यासाठील लावला हातभार

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : ईदनिमित्त मुस्लीम समाजातील २०० कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख आणि शिरखुर्मा किट वाटप करून नगरसेवकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मुस्लीम समाजात रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात प्रत्येक मुस्लीम बांधव आपापल्या परीने ईद साजरी करीत असतो. मात्र यंदाच्या या सणावर कोरोनासारख्या महामारीने विरजण घातले आहे. समाजातील गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या तर ईद साजरी करावी तरी कशी असा प्रश्न पडला असताना येथील नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम व त्यांच्या परिवाराने सामाजिक औदार्य दाखवत ईदपूर्वीच गरीब व गरजू २०० कुटुंबांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व शिरखुर्मा किट वाटून मानवतेचा संदेश देत या गरीब कुटुंबाची ईद साजरी करण्यासाठी हातभार लावला आहे.
तसेच शहरातील गरजू नागरिकांना काही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य केले जाईल, असे आश्वासन शेख कुर्बान यांनी दिले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक हेमराज चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: In Faizpur, on this occasion, the corporator made a social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.