फैजपूर प्रांताधिकाऱ्यांनी मराठा जातीचा पहिला दाखला प्रदान केला अपंग लाभार्थीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 07:06 PM2018-12-14T19:06:39+5:302018-12-14T19:08:07+5:30
सेतू सुविधा केंद्रातील दिव्यांग कर्मचारी कमलाकर चौधरी व शहरातील चहा विक्रेता मनीष महाजन या तरुणाला तहसील कार्यालयात प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते फैजपूर महसूल उपविभागातून मराठा जातीचे पहिले दाखले प्रदान करण्यात आले.
रावेर, जि.जळगाव : सेतू सुविधा केंद्रातील दिव्यांग कर्मचारी कमलाकर चौधरी व शहरातील चहा विक्रेता मनीष महाजन या तरुणाला तहसील कार्यालयात प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते फैजपूर महसूल उपविभागातून मराठा जातीचे पहिले दाखले प्रदान करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभरात ५८ मोर्चे निघाल्याची व ६० जणांचे बलिदान पाहता शासनाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाचे आरक्षण मराठा समाजासाठी घोषित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने १४ डिसेंबर रोजी रावेर तहसील कार्यालयातील ‘आपले सरकार सेवा केंद्र (सेतू)’ मार्फत १२ डिसेंबर २०१८ रोजी मराठा जातीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसात दाखला तयार करून चहा व्यावसायिक मनीष लक्ष्मण महाजन व सेतू सुविधा कक्षातील कर्मचारी दिव्यांग कमलाकर विश्वनाथ चौधरी या दोन लाभार्र्थींना शुक्रवारी फैजपूर उपविभागातील मराठा जातीचे सर्वप्रथम दाखले उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याहस्ते आॅनलाइन स्वाक्षरीने रावेर तहसिल कार्यालयात फैजपुर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसिलदार विजयकुमार ढगे यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.
या वेळी निवासी नायब तहसीलदार कविता देशमुख, लिपीक प्रवीण पाटील, सेतू कर्मचारी धनराज घेटे, प्रदीप महाजन, महेंद्र वानखेडे, अतुल चौधरी, प्रशांत महाजन, भावेश तायडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.