पोषण आहारातील बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:28 AM2020-12-03T04:28:20+5:302020-12-03T04:28:20+5:30
- बीएचआर प्रकरणी झंवर यांच्याकडील छाप्यात सापडले आहेत शिक्के लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय पोषण आहाराचा ठेका सुनील ...
- बीएचआर प्रकरणी झंवर यांच्याकडील छाप्यात सापडले आहेत शिक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शालेय पोषण आहाराचा ठेका सुनील झंवर याच्या साई मार्केटिंग कंपनीकडे असताना यात गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या, चौकशी समीतीकडून ठपकाही ठेवण्यात आला. मात्र, कारवाई शून्य असल्याने जि. प. प्रशासनावरही राजकीय दबाव होता, असे स्पष्ट होत आहे. झंवर यांच्याकडे बनावट शिक्के, कागपत्रे आढळून आली आहेत.
वर्षभरापूर्वी पोषण आहारातील धान्य व इतर माल शाळांना न देता त्याचीही बिले साई मार्केटिंगकडून वसूल करण्यात आली होती. त्यात बनावट शिक्क्यांचा वापर झाल्ल्याचा आरोप झाला होता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांची पोषण आहार प्रकरणात चौकशीचे आदेश देताच त्यांची झाली होती.