चाळीसगावला बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा, दीड लाखाचे बनावट मद्य हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:21 PM2018-01-30T13:21:17+5:302018-01-30T13:22:32+5:30

नाशिकच्या भरारी पथकाची कारवाई

Fake liquor factory in Chalisgaon | चाळीसगावला बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा, दीड लाखाचे बनावट मद्य हस्तगत

चाळीसगावला बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा, दीड लाखाचे बनावट मद्य हस्तगत

Next
ठळक मुद्दे शहरात शहरात मोठी खळबळ बनावट मद्य रिकाम्या बाटलींमध्ये भरतांना रंगेहाथ आढळून आला

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि.जळगाव, दि. 30 -  गणेश रोड लगत   एका घरात चालणा-या बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने मंगळवारी सकाळी सात वाजता छापा टाकून एक लाख 53 हजार 384 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे शहरात शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 
मनोज सदाशिव मांडगे (वय 42) हा आपल्या घरात ( क्र. 12829)  अवैद्यरित्या परराज्यातून आणलेल्या मद्याकार्पासून बनावट दारु तयार करीत होता. याबाबत गुप्त माहितीवरुन नाशिक विभागाच्या निरीक्षक एम.बी. चव्हाण, एस.के. कोल्हे दुय्यम निरीक्षक वाय.एस. सावखेडकर, आर.आर. धनवटे, के.एन. गायकवाड, जी.जी. अहिरराव, आर.के. लब्दे यांच्या भरारी पथकाने पाळत ठेऊन मंगळवारी सकाळी सात वाजता छापा टाकला. यावेळी पथकाला मांडगे हा बनावट मद्य रिकाम्या बाटलींमध्ये भरतांना रंगेहाथ आढळून आला. उच्च प्रतीचे देशी - विदेशी ब?न्डचे मद्यही मिळून आले. बनावट मद्य भरालेल्या बाटल्यांना लावण्यासाठी आणलेले बनावट बुच यासह एक लाख 53 हजार 384 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. गुन्हा नोंदविण्या आला असून निरीक्षक एम.बी. चव्हाण करीत आहे.

Web Title: Fake liquor factory in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.