शिक्षण विभागात पुन्हा एक बनावट स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:24 PM2020-03-14T13:24:43+5:302020-03-14T13:25:46+5:30

भडगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

A fake signature again in the education department | शिक्षण विभागात पुन्हा एक बनावट स्वाक्षरी

शिक्षण विभागात पुन्हा एक बनावट स्वाक्षरी

Next

जळगाव : शिक्षण विभागात बनावट स्वाक्षरी प्रकरणांचा पूरच आल्याचे चित्र असून आता कजगावच्या एका केंद्रप्रमुखाने गटशिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून २० हजार रूपयांचे एक बिल मंजूर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार आली असून यामुळे खळबळ उडाली आहे़
भडगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील यांच्याकडे आॅगस्ट २०१८ ते जून २०१९ पर्यंत प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदभार होता़ त्या काळात कजगाव कन्याशाळेचे उपशिक्षक प्रभारी केंद्रप्रमुख कोमलसिंग पाटील यांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभाराच्या विशेष वेतन बिलावर गटशिक्षणाधिकारी पाटील यांची बनावट स्वाक्षरी करून बीडिओंकडे दिले़ नंतर १९ हजार ४१६ रूपये त्यांना अदा झाले. हे लक्षात आल्यानंतर गणेश पाटील यांनी शिक्षण विभागाला पत्र दिले असून कारवाईची मागणी व गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली आहे़ १६ रोजी होणाºया शिक्षण समितीच्या सभेत काय होते याकडे लक्ष लागून आहे.
अद्याप आपल्यापर्यंत अशी तक्रार आलेली नाही. मात्र, या विषयी माहिती घेतो.
- डॉ़ बी़ एऩ पाटील, सीईओ

Web Title: A fake signature again in the education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव